गोमूत्र शिंपडणाऱ्यांची चौकशी करा असे बरळणारे… संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का ? गजू घोडके यांचा सवाल….!
लाल दिवा : स्वतःला कट्टर हिंदू म्हणविणारे ठाकरे गटाचे वाचाळवीर आणि कथित विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना हिंदू धर्माची एलर्जी झाली असवी आणि आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवादीचे पोपट बनले की काय ? आणि त्यांचे डोके फिरले आहे काय ? अशी शंका निर्माण होत आहे. ही व्यक्ती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असूच शकत नाही. असे प्रतिपादन लव्ह जिहाद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि कडवे हिंदू सैनिक गजू घोडके यांनी केले.
हिंदूंच्या भावना दुखाविल्या की लगेचच आंदोलनाची हाक देणारे संजय राऊत आता हिंदूंविरुद्धच आग ओकत असल्याचे जेव्हा दिसते तेव्हा महाविकास आघाडीच्या दावणीला बांधल्यानंतर कोण किती लाचार होऊ शकतो हे याची देही याची डोळा बघण्याची वेळ येते तेव्हा अक्षरशः शरमेने मान खाली जाते. उद्धव ठाकरे हेसुद्धा याबाबत डोळ्यावर पट्टी बांधून धृतराष्ट्राची भूमिका घेतात तेव्हा हा पक्ष आता हिंदूधार्जीणा राहिला काय हा खरा सवाल आहे त्र्यंबकेश्वर प्रकरणी संजय राऊत यांनी केलेले विधान समस्त हिंदू बांधवांचा अवमान करणारेच आहे.त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवून चादर चढविण्याच्या बहाण्याने मंदिरात शिरकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम व्यक्तींना तेथील सुरक्षारक्षकांनी रोखले.ही पूर्वपारची परंपरा आहे,असा युक्तिवाद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.परंतु त्यांचा हा दावा त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांनी खोडून काढला.यानंतर कट्टर हिंदू नेत्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गोमूत्र शिंपून तो परिसर स्वच्छ केला. गोमूत्र शिंपडण्याच्या प्रकाराचे समर्थन करण्याऐवजी या प्रकाराची खिल्ली उडवण्याचे काम काही पक्ष आणि संघटनांनी केले त्या सर्वांची कीव कराविसी वाटते.संजय राऊत यांनी तर सर्वांवर कडी केली.ज्यांनी गोमूत्र शिंपडले त्यांची चौकशी करा असे सांगून राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या हिंदू बांधवांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला याला काय म्हणावे? त्र्यंबकच्या एका गुरुजींना त्यांनी बळजबरीने पत्र लिहिण्यासही भाग पडल्याचे सांगितले जाते. इतरांच्या तोंडची भाषा बोलू लागला की माणूस सरड्यासारखे रंग कसे बदलतो याचे राऊत हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तसेच नाशिक आणि मंचर येथील लव्ह जिहाद प्रकरण म्हणजे थोतांड आहे असे राऊत म्हणतील की प्रत्यक्ष तेथे जाऊन या प्रकरणाची खात्री करतील हासुद्धा खरा सवाल आहे.त्रंबक घटनेबद्दलच्या राऊत यांनी जे वक्तव्य केले त्यावरून हा माणूस इतके दिवस खरंच हिंदुत्वाची कास धरत होता का अशी शंका निर्माण झाली आहे. हा माणूस नक्कीच भ्रमिष्ट झाला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. संजय राऊत हिंदूविरुद्ध असेच बरळत राहिले तर त्यांना हिंदू बांधव त्यांची जागा दाखवून देतील हे लक्षात ठेवावे. उद्धव ठाकरे यांनीही या माणसाची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची गरज आहे.तसे न केल्यास केवळ या एका माणसामुळे पक्ष रसातळाला जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे असा सल्लाही गजू घोडके यांनी दिला आहे.