गरोदर पत्नीचा काळजाचा ठोका चुकवणारा अंत! पतीच्या क्रूर हातून मृत्यूच्या दाढेत! एलसीबी आणि नाशिक तालुका गुन्हे शाखेचे कौशल्यपूर्ण तपासकार्य!
गरोदर पत्नीचा खून! पतीच्या मुसक्या आवळल्या, एलसीबी आणि तालुका पोलिसांची संयुक्त कामगिरी
लाल दिवा नाशिक,या.५:-: काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या गरोदर महिलेच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. अमृता कुमारी विकीराय यादव (१९) हिचा खून तिच्या पतीनेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विकी राय यादव याने चारीत्र्यावर संशय घेऊन अमृताचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)चे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांचे विशेष योगदान राहिले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता अहिल्याबाई होळकर पुलाजवळून बेपत्ता झाल्याचे वृत्त आल्यानंतर *एलसीबी आणि तालुका पोलीसांनी* तपास सुरू केला होता. सुरुवातीला विकी राय यादव यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, पोलीस निरीक्षक आमले यांनी केलेल्या कसून चौकशीत, एलसीबी पीआय सुर्वे यांनी मिळवलेल्या महत्वाच्या माहितीच्या आधारे, विकीनेच अमृताला गोदावरी नदीच्या काठी फिरायला नेण्याच्या बहाण्याने झाडाच्या आडोशाला नेऊन तिच्या अंगावरील ओढणीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले.
या गुन्ह्याचा छडा लावण्यात एलसीबी आणि तालुका पोलिसांनी दाखवलेल्या चपळतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विकी राय यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अ.मृ.क्रं. २१/२०२५, दिनांक ०३/०३/२०२५, वेळ १७:२६ वा.) नाशिक ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पंचवटी पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक ०२५३-२३०९७११ आहे. या गुन्ह्याची माहिती ४ मार्च रोजी रात्री ११:१३ वाजता ईमेलद्वारे प्राप्त झाली असून ती ११:१९ वाजता आयजी सीआर यांना पाठवण्यात आली आहे.
पतीनेच केला गरोदर पत्नीचा खून.
चारीत्र्यावर संशय घेऊन हत्या.
एलसीबी आणि तालुका पोलिसांची संयुक्त कामगिरी.
आरोपीला अटक
एलसीबी आणि नाशिक तालुका गुन्हे शाखेचे कौशल्यपूर्ण तपासकार्य.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीला जेरबंद.
चारीत्र्याच्या संशयावरून पतीनेच केला गरोदर पत्नीचा खून.
गोदावरीच्या काठी घडली हृदयद्रावक घटना