दोनदा राष्ट्रपती पदक मिळालेल्या…. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड.. यांच्यावर झालेल्या आरोपांचा मी जाहीर निषेध करतो……. गजू घोडके …!
लाल दिवा : एकीकडे नाशिक पोलिसांच्या कर्तव्यावर काहीजण शिंतोडे उडवत असताना दुसरीकडे नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी पोलिसांच्या मागे उभे राहणे पसंद केले आहे.
एकीकडे नाशिक चे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे नाशिक शहरात खऱ्या अर्थाने नागरिकांना रस्त्यावर फिरणे सोपे झाले आहे. पोलीस रात्रीचा दिवस करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहे. तर दुसरीकडे काही जण आपले हितसंबंध जोपासण्यासाठी पोलिसांवर धांदल आरोप करत आहेत. अशा आरोप करणाऱ्यांनी स्वतः आपल्या घरात झाकून बघावे म्हणजे आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत. हे लक्षात येईल. त्यामुळे दोनदा राष्ट्रपती पदक मिळालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा व आरोप करणाऱ्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. मी व माझे नाशिककर जनता पोलीस आयुक्त व नाशिक पोलिसांच्या पाठीशी आहोत.
ज्यांनी कोणी कर्तव्यदक्ष पोलिसांवर आरोप केले आहेत त्यांचा भांडाफोड मी नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही असे देखील मत सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी लाल दिव्याशी बोलतांना सांगितले