दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर….!

लाल दिवा-मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर, २०२३ व ०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट व मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१,मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ७८ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 

या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वजित श्यामराव पाटील (बैठक क्रमांक NM003080) हे अराखीव वर्गवारीतून व सोलापूर जिल्ह्यातील सोनलकर विनायक भागवत (बैठक क्रमांक NM001050) हे मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला अराखीव वर्गवारीतून सांगली जिल्ह्यातील चव्हाण शैलजा नरेंद्र (बैठक क्रमांक NM001135) राज्यात प्रथम आल्या आहेत.परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

 

अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्रमांक ६.४.४ पहावे असे आयोगाने कळविले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!