तिरंग्याचा अवमान प्रकरणी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा !
लाल दिवा, ता. २७ : राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी, पालक मंत्री, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त नाशिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतीय झेंडा संहिता २००२, तथा राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल होणे बाबत पोलिसाना निवेदन देण्यात आले आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होत असून, राष्ट्रीय ध्वज हा फाटलेल्या अवस्थे मध्ये फडकत असून, त्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. सदर राष्ट्रीयध्वजाची विटंबना होत असून, करोडो भारतीयांच्या भावना दुखावल्या जात आहेत. राष्ट्रीयध्वजाच्या झालेल्या दुरावस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे व या प्रकरणास पूर्णपणे नाशिक चे पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त हे जबाबदार आहेत.
तरी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी, पालक मंत्री तथा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, नाशिक ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.