शेतकऱ्यांच्या पाठीची सरकार खंबीरपणे उभे, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये….!
लाल दिवा-नाशिक,ता.२६: राज्यभरात काल पासून अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्रचंड फटका बसला आहे. आज सकाळी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या सोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. तातडीने नुकसानग्रस्त भागाच्या पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी खचू नये सरकार यातून सकारात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देईल. जिल्ह्यातील पिंपळगांव व निफाड तालुक्यातील नुकसानीची सकाळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवला आहे. यावेळी संबंधित अधिकारी यांना नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे आवाहन याप्रसंगी केले.