उपनगर पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीने नागरिकांमध्ये समाधान…!
लाल दिवा, ता. २२ : पोलीस उपआयुक्त परिमंडळ -२ कार्यालयातील पो. अंम. विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ यांच्या आदेशान्वये उपनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सचिन चौधरी, पोना गुंड, पोशि गौरव गवळी, पंकज कर्पे, जयंत शिंदे, सुरज गवळी, अनिल शिंदे, सौरभ लोंढे यांनी सदर बातमी प्रमाणे आरोपी १ ) मिलींद मेश्राम, रा. पुणे शहर, २) सागर वैरागर, रा. सोनाई, ३) नितीन हासे, रा. अहमदनगर, ४) बंटी मंदके, रा. नागपुर यांना ताब्यात घेण्यात आले असुन सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे राकेश बोराडे दि. २०/०५/२०२३ रोजी गुरनं २०३ / २०२३ भा. द. वि. कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे राकेश उत्तम बोराडे यांचा फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत पुढील प्रमाणे-
यातील फिर्यादी यांचा खादय अन्न खरेदी विक्रीचा व्यापार करणारी समृध्दी एजन्सीज नावाची नोंदणीकृत कंपनी आहे. यातील आरोपी प्रणव राजहंस याने फिर्यादी यांचे सोबत संपर्क साधून त्यांना सांगितले की, तो व त्याचा मित्र भुषण बाळदे यांच्याकडे कोलकाता येथील रॅडीसन ग्लोबल एनर्जी या कंपनीचे फायनान्सचे काम आहे. सदर कंपनी व्यवसायांना २४ महिन्यांसाठी बिनव्याजी कर्ज / फायनान्स करते. तसेच दोन वर्षानंतर (मुदत संपल्यानंतर) फिर्यादी यांची कंपनीला नुकसान झाले असे दाखवून सदरचे लोन परत करायची गरज पडणार नाही असे आमिष दाखविले. फिर्यादी यांचे मित्र प्रवीण देशमुख यांना एक कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज / लोन देणार आहेत. त्यांच्याकडून १० लाख रू. मिळाले आहेत, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादी यांनी नवीन सोलार प्लॉट चालू करण्यासाठी लोन घेण्याचे ठरवले. आरोपी प्रणव राजहंस व भुषण बाळदे यांनी फिर्यादी यांना ५ कोटी रू. लोन देण्याचे व त्या मोबदल्यात फिर्यादी कडून १० टक्के म्हणजे ५० लाख रु. रोख दयावे लागतील असे सांगितले.
रॅडीसन ग्लोबल एनर्जी व फिर्यादी यांच्या समृध्दी एजन्सीज यांच्या नावाचा उसनवारी करारनामा तयार करून दिला असता फिर्यादीने यासाठी तयारी दर्शविली. दि. २०/०५/२०२३ रोजी आरोपी पवण व भुषण यांनी त्यांचे चार साथीदारांना ५ कोटी रूपयांचा बनावट डीडी फिर्यादी यांना देण्यासाठी पाठविले. सदर डीडीची फिर्यादी यांनी पीएनबी बँकेत जावून खात्री केली असता बँक मॅनेजर यांनी सदरचा डीडी बनावट असल्याचे सांगून पोलीसात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याने फिर्यादी यांनी पोलीसांना माहिती दिल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी जावून चारही आरोपींना ताब्यात घेतले. सदर गुन्हयात
१) मिलींद दिवाकर मेश्राम वय ३९ वर्षे, रा. वाघोली, पुणे
(२) सागर रावसाहेब वैरागर, रा. सोनई ता. नेवासा, जि. अहमदनगर
३) नितीन रावसाहेब हासे वय ४० वर्षे, रा. चिखली ता. संगमनेर, जि. अहमदनगर,
४) बंटी दिलीव मेंडके, रा. गोडी दिग्रस ता. काटोल, जि. नागपुर यांना अटक केली असुन त्यांना दिनांक २४/०५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे. यातील पाहीजे आरोपी
५) प्रणव राजहंस, रा. सोनई ता. नेवासा, जि. अहमदनगर
६) भुषण बाळदे, रा. सोनई ता. नेवासा, जि. अहमदनगर यांचा शोध घेत आहोत. सदर गुन्हयाच पुढील तपास सपोनि / सचिन चौधरी हे करीत आहेत.