नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाकडून १७ वा इच्छुक उमेदवार म्हणून मयुर अलई यांची एन्ट्री!
नाशिक पश्चिमची ‘बॅनरबाजी’: मयुर अलईंच्या एन्ट्रीने भाजपात खळबळ!
लाल दिवा-नाशिक,दि.२८:-: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून येत्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने आता नवे नाव पुढे आले आहे ते म्हणजे मयुर अलई. नाशिक पश्चिममध्ये सर्वत्र त्यांचे “भावी आमदार” असे बॅनर्स झळकू लागले आहेत. यासह इच्छुक उमेदवारांची संख्या १७ वर पोहोचली आहे.
सीमा हिरे यांच्यासाठी आव्हान: मयुर अलई यांच्या एन्ट्रीमुळे सध्याचे आमदार सीमा हिरे यांच्यासमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. मयुर अलई यांना यापूर्वी दोनदा या मतदारसंघातून उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती, परंतु ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. एकदा तर त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. त्यामुळे यावेळी मात्र आपली उमेदवारी निश्चित होईल, असा आत्मविश्वास अलई यांनी व्यक्त केला आहे.
अलई यांची ताकद: नाशिक पश्चिममध्ये भाजपाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातही लाडशाकीय वाणी समाजातील ३५ हजारांपेक्षा जास्त मतदार हे अलई यांच्या बाजूने असल्याचे बोलले जाते. केमिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष राहिलेले असल्याने मेडिकल फिल्डमधील फार्मासिस्ट, एम.आर. आणि कर्मचाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. कसमादे पट्ट्यातील नागरिक देखील त्यांना चांगले ओळखतात. कुठल्याही वादात न अडकणारे, वरिष्ठांशी चांगले संबंध असणारे आणि उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून अलई यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे भाजपाकडून नवीन चेहरा म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- इच्छुक उमेदवारांची यादी:
१. सीमा हिरे, २. दिनकर पाटील ३. प्रदीप पेशकार, ४. सतीश कुलकर्णी, ५. मयुर अलई, ६. सुनील बच्छाव, ७. धनंजय बेळे, ८. अनिल जाधव, ९. लक्ष्मण सावजी, १०. अजित चव्हाण, ११. बाळासाहेब पाटील, १२. जगन पाटील, १३. शशिकांत जाधव, १४. दिलीप भामरे, १५. प्रशांत पाटील, १६. मुकेश शहाणे, १७. राजेंद्र महाले.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्व नाशिक पश्चिममधून कोणाला उमेदवारी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले