भूमी अभिलेख कार्यालयातील दिव्यांगाच्या बदल्या होतील का ?
लाल दिवा, ता. ४ : गेल्या दोन वर्षापासून भूमी अभिलेख विभागाचे बदल्या प्रशासकीय बदल्या विनंती बदल्या झालेल्या नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ज्या दिव्यांग कर्मचारी गट क, गट ड क्लार्क आणि शिपाई कर्मचारी हे बाहेर जिल्ह्यात सेवा करीत आहे. ते दिव्यांग असल्यामुळे खूप त्रास सहन करून सेवा करीत असतात आणि ते दिव्यांग असल्यामुळे त्यांच्या हालचाली मंदावलेल्या असतात. त्यांना त्रास होतो त्यांना सहानुभूतीचे खूप आवश्यकता असते
तरी आता मे महिन्यातील होणाऱ्या बदल्या मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक १५/१२/२००४ प्रमाणे आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 प्रमाणे आणि शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2022 त्यांचे बदल्या त्यांचे राहत्या गावाजवळ करण्यात यावे.असे शासन निर्णय आहे. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.