विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांच्या नवीन पॅनल नियुक्तीसाठी 19 मे रोजी होणार मुलाखत .- जिल्हाधिकारी गंगाथरन डी….!
लाल दिवा -नाशिक, ता.१५ नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहर व तालुकास्तरीय न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 25 (3) प्रमाणे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांच्या नवीन पॅनल नियुक्तीसाठी 24 एप्रिल 2023 रोजीच्या अधिसूचनेन्वये उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यातील पात्र उमदेवारांची मुलाखत 19 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
प्राप्त अर्जातील पात्र व अपात्र उमेदवारांच्या नावांची यादी या
http://nashik.gov.in/notice_category/recruitment-en
वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांना मुलाखातीचे पत्र पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे.