राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारीणी ची बैठक जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…!
लाल दिवा-नाशिक,ता.१: राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची नाशिक जिल्हा कार्यकारिणी ची बैठक राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुढील राजकीय वाटचाल, तालुका कार्यकारिणी गठण करणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे प्रत्तेक गावांमध्ये जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी गावोगावी भेट देऊन कार्य पोहचवण्याचे काम जिल्हा पदाधिकाऱ्यांनी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांनी केले तसेच आगामी काळात सर्व बूथ रचना करून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे अशी सूचना करण्यात आली, लवकरच गाव तेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन कासव यांनी सांगितले.
यावेळी बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष सागर खैरनार, समाधान आहिरे, सोहेल मोमीन, हर्षल इथापे, संतोष अढागळे, नवनाथ शिल्लक, रावसाहेब ठोंबरे, मनोज गुजरे, जिल्हा संपर्क प्रमुख महेश गादेकर, जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी, महेंद्र सानप, संदीप पगार, वैभव जाधव, कृष्णा मातेरे, संदीप गोतरणे, विशाल भडके, विक्रम गांगुर्डे, मेघदिप सावंत, अक्षय गांगुर्डे, प्रतीक नागरे, रोहित पाटील, हेमंत मोरे, पराग गांगुर्डे, राजेश हाडपे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते
.