श्रवण यंत्र व तीन चाकी सायकलचे वाटप….!

लाल दिवा : शासकीय अंधशाळा नाशिक येथे महात्मा गांधी सेवा संघ संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक, जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद, नाशिक व जिल्हा शल्य रुग्णालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग करिता कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते, या शिबिरामध्ये सहा नग श्रवण यंत्र व पाच नग तीन चाकी सायकल यांचे वाटप करण्यात आले.

   उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींकरिता श्रीमती कविता जुनेजा जिल्हा समन्वयक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांनी राज्य व केंद्र शासन मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेची माहिती दिली. यावेळी योगेश पाटील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व श्रीमती मानसी वाझट, अधीक्षिका शासकीय अंधशाळा व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!