पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेल्या अधिकारी अंमलदारांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव …….किरणकुमार चव्हाण, निलेश माईनकर, इम्रान सलिम शेख आदीं
लाल दिवा, ता. २७ : १ मे महाराष्ट्र दिनानिमीत्त प्रत्येक वर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्तर कामगिरी बद्दल आणि उल्लेखनिय – प्रशसनीस सेवेबद्दल महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत असते. सन २०२३ या वर्षाकरीता महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना विविध प्रवर्गात मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचिन्ह दिनांक २६/०४ / २०२३ रोजी घोषित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाशिक शहर घटकात कार्यरत ०२ अधिकारी व १२ अंमलदार हे सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत.
त्यामध्ये १) श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१ नाशिक शहर २) श्री. निलेश माईनकर, वपोनि उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर ३) सपोउनि शंकर जनार्दन गोसावी ४) सपोउनि काशिनाथ कृष्णाजी गायकवाड ५) पोहवा धनाजी उत्तम माळोदे ६) मपोना माधुरी अशोक मुरकुटे ७) पोना इम्रान सलिम शेख ८) पोना संतोष विष्णु उशीर ९) पोना सोमनाथ हरी निकम १०) पोना गजानन रघुनाथ पाटील ११) पोनानिलेश मधुकर भोईर १२) पोना श्रीशैल काशिनाथ सवळी १३) पोना गणेश विश्वनाथ वाघ १४) पोना श्यामकांत एकनाथ पाटील अशांचा समावेश आहे. नमुद अधिकारी अंमलदार यांचा आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी गुलाब पुष्प देवून अभिनंदन केले व त्यांचेबद्दल गौरवउद्गार काढले.
कार्यक्रमास मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे सह मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, नाशिक शहर, मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २ व पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते..