धुळे पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक श्यामकांत सोनवणे यांना अँटी करप्शन ने केली अटक !

लाल दिवा, ता. ८ : दि. ०८.०५.२०२३ लोकसेवक श्यामकांत नानाभाऊ सोनवणे, कनिष्ठ सहायक, बांधकाम विभाग, पंचायत समिती, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन ३,५००/रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले म्हणुन गुन्हा दाखल.

तक्रारदार हे पंचायत समिती धुळे येथे शाखा अभियंता या पदांवर कार्यरत असुन ते एप्रिल २०२२ पावेतो रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. सदर कालावधीतील सदर बिटचे विभागीय लेखापरिक्षण (ऑडीट) झाले होते. सदर झालेल्या लेखा परिक्षणांच्या नावाने बक्षिस म्हणुन कनिष्ठ सहायक श्री. श्यामकांत सोनवणे हे तक्रारदार यांच्या कडे सुमारे ०८ ते १० दिवसांपासुन वेळोवेळी प्रत्यक्ष भेटीत व मोबाईल वर कॉल करून ३५००/- रूपये लाचेची मागणी करीत असल्यांची तक्रारदार यांनी आज रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज दि.०८.०५. २०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे ३५००/- रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द देवपुर पश्चिम पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक श्री. मंजितसिंग चव्हाण, तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

 

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!