आ. सीमा हिरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्या बाबत कार्यकर्त्यांकडून धनंजय बेळे यांचा जाहीर निषेध !
लाल दिवा, ता. २० : स्वतःच्या मतदारसंघात कार्यक्रम असूनही त्या मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांना निमा पदाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर डावलल्याने आमदार समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धनंजय बेळे यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
काल सकाळी निमा आयोजित निमा पॉवर प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत या मतदारसंघाच्या आमदार हिरे यांचे नाव वगळण्यात आले होते. तरीही उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सौ. हिरे उद्घाटनस्थळी उपस्थित झाल्या. मात्र, निमाच्या अध्यक्षांनी त्यांची व्यासपीठावर आसनव्यवस्था आरक्षित केली नव्हती. शिवाय त्यांनी हिरे यांची साधी विचारपूसही केली नाही.
कार्यक्रमाच्या शुभारंभाची फीत कापण्याच्यावेळी मोठी गर्दी झाल्याने आमदार हिरे खाली कोसळल्या. त्यांच्या पायाला दुखापत झाली. म्हणून त्या कार्यक्रम अर्धवट सोडून माघारी फिरल्या. या घटनेची माहिती तेथे उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादा भुसे यांना समजताच त्यांनी आमदार हिरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना झालेल्या दुखापतीची विचारपूस केली. परंतु, कार्यक्रमाचे आयोजक असलेले निमाचे अध्यक्ष यांनी आ. हिरे यांची दखलही घेतली नाही. हा प्रकार समजताच मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी निमा अध्यक्षांविरुद्ध संताप व्यक्त केला. निमा अध्यक्षांच्या एककल्ली कारभारामुळे हा सर्व प्रकार झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.
Статья рассказывает о различных платных и бесплатных способах продвижения объявлений на доске.