दिरानं केली काळी रात्र, वहिनीला घरातच ओढली वासनेच्या आगीत !
हव्यासाचे बळी ठरली वहिनी, अंबडमध्ये धक्कादायक प्रकार उघड
लाल दिवा-नाशिक,दि.२२अंबड (प्रतिनिधी) – “दिवस उजाडला होता, पण माझ्यासाठी तो काळोख्या रात्रीपेक्षाही भयानक होता. माझाच दीर माझ्यावर तुटून पडला. प्रतिकार करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण…” अशी धक्कादायक घटना अंबडमधील सिडको भागात घडली आहे. दिर आणि पतीच्या या नराधमांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ११ सप्टेंबर रोजी दुपारी घरी एकटी होती. त्याचवेळी तिचा दीर घरी आला. सुरुवातीला सर्वकाही नेहमीसारखेच होते. पण अचानक त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिच्या पतीनेही त्याला मदत अपप्रेरणा केली.
घाबरलेल्या आणि हादरलेल्या पिडीत महिलेने १० दिवसांनी धाडस करून अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत आपबित्ती सांगितली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२५/२०२४ अन्वये भादंवि कलम ६४(१), ४९, ३५१(२)(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे तपास करीत आहेत. दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:५५ वाजता स्टेशन डायरी क्रमांक ४३/२०२४ मध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कारंडे यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. पोलीस उपनिरीक्षक कारंडे, पोलीस निरीक्षक शिरसाठ आणि पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.