पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचा झाला सन्मान !
लाल दिवा, ता. १ :
शिक्षण, आरोग्य, औद्योगिक अशा विविध क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत
लोक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांना नागरिकांची साथ मिळत असून जिल्हा विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यानी केले, आज पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते व्यजारोहण संपन्न झाले. चावळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाधरन डी. विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक उमाप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व
नागरिक उपस्थित होते.
♦
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, बालपणातच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी
जिल्ह्यातील १२७ जिल्हा परिषद शाळा माडल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यात ३५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मुलभूत व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील १२ वी, १२ वी च्या विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना मोफत सीईटी / नई यासारख्या परीक्षांची संधी मिळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतून सुपर कपटी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. याअंतर्गत सय्यद पिंप्री येथे निवासी
स्वरुपात विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू असून नियोजन समितीमार्फत ५० लाख रुपयांचा निधी त्यासाठी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने नाशिक येथे शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था जून २०२३ पासून मंजूर करण्यात आली आहे. प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी ३० विद्यार्थीनीना पाल
प्रवेश घेता येणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितल
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने तृणधान्य पिकांची उत्पादन व तृणधान्याचा आहारातील समावेश वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात ३ हजार ३३५ कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच कृषी विभागामार्फत जिल्ह्यात विविध कृषी विषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत २०२२-२३ खरीप हंगामात शेतकन्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी १६ कोटी ५५ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच पश्चात हजार १६९ कोटी ३४ लाख अनुदान पीक विमा कंपनीमार्फत वितरीत करण्यात आले आहे. तसेच केंद्र समूह विकास कार्यक्रमाअंतर्गत नाशिक कन्टरसाठी रुपये तीनशे कोटी मंजूर करण्यात आले आहे. अशी माहितीही
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्ली. यावेळी पालकमंत्री से महणाले, धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियानात दहा लाख २५ हजार १९२ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून २ हजार २१४
यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच २४ हजार ७८१ इतर आजाराचे निदान करून रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जागरुक पालक सुदृढ बालक’ या मोहिमे अंतर्गत ग्रामीण भागातील ० ते १८ वयोगटातील १ लाख १६ हजार २२३ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांत अंगणवाडीतील ४ लाख ४९ हजार १११ तर शाळेतील ७ लाख ४८ हजार ४४१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यात २२५ रोगाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ह्यातील सर्व तालुक्यांत आर्थिक दुर्बल घटकांसाठी माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याने याचा सर्वांनी लाभ घ्यावा,
असे आवाहनही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात ७ लाख सहा हजार ४१३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिक्षा” वाटप
करण्यात आला आहे. तसेच शिवभोजन योजनेत जिल्ह्यात ८४ केंद्रांमार्फत दररोज १० हजार ५७५ यांचे वितरण केले जात असल्याची माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नऊ हजार १७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यासाठी १७ कोटी ३६ लाख ३६ हजाराची मदत शासनाने तातडीने मंजूर करून शेतकन्यांना मदतीचा हात दिला आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासकीय सेवेत ७५ हजार पदं भरण्याचे शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यात जिलातील नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर २७५ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली आहे. असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले
ऑनलाईन फसवणुकीस प्रतिबंध बसून सोशल मीडियाच्या वापराबाबत नागरिक साक्षर
होण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांसाठी सावरत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे विविध पुरस्कारांनी यांना केले सन्मानित…..पोलीस आयुक्त कार्यालयः पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश मानकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी, काशिनाथ
गायक अशोक जगताप, पोलीस हवालदार धनाजीमामाधुरीमुरकुटे पोलीस नाईक इमरान सलीम शेख, सोमनाथ हरी निकम, गजानन रघुनाथ पाटील,
निलेश मधुकर भोईर, विशाल रघुनाथ सावळे, श्री काशिनाथ सवळी, गणेश विश्वनाथ याच शामकांत एकनाथ पाटील, संतोष विष्णुपंत उशीर यांचा पोलीस
महासंचालक पदकाने सन्मानित केले. > महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक
पोलीस उपनिरीक्षक सुभाष गुंजाळ, सहायक कवायत निर्देशक पिटु भांगरे, संतोष
यादव पोलीस नाईक कुणाल काळे कुलकर्णी यांना पोलीस महासंचालक पदक
व सन्मान चिन्ह देवून सन्मानित केले.
प्रतिवर्धक विभाग, नाशिक परिक्षेत्र:
पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, नितीन कराड, प्रि महाजन, अजयगड, शरद अमोल मानकर यांना पोलीस महासंचालक पदक सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले.
★ जिल्हा पोलीस अधीक्षकः सहायक पोलीस निरीक्षक मृनौर सैय्यद, पोलीस हवालदार नवनाथ सानप यांना पोलीस महासंचालकपद व सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले. > पोलीस उपअधीक्षक, ना. ह. सं. नाशिक परिक्षेत्र, नाशिक:
पोलीस हवालदार जयवंत सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शेलार पोलीस महासंचालक पदक व
सन्मान चिन्ह देवून सन्मानित केले. > आदर्श तलाठी पुरस्कार:
एस. एस. कदम, तलाठी सजानादरवैध, तालुका इगतपुरी > जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक: कुसुमताई चव्हाण, कालिंदी हिंगे, डॉ. विद्या सोनवणे, प्रा. डॉ. जोत्सना सोनखासकर,
शुभांगी बेळगावकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित फेले.
> जिल्हा क्रीडा कार्यालय: गुणवंत खेळाडू पुरस्कार २०२२ करीता वेटलिप्टींगसाठी आकांक्षा व्यवहारे, रोइंग (महिला) कोमल बोडके, रोग (पुरुष) निलेश चोडगे, शुटींग व जलतरण प्रकारात दिव्यांग गुणवंत खेळाडू पुरस्कार म्हणून जयश्री उत्तम टोचे, जिल्ला युवा पुरस्कार
२०२१-२२ मध्ये अजहर अली अल्ताफ अली युवक, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी
संस्था, मालेगांव संस्था, वसंत देवराम राठोड, युवक, साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, नाशिक संस्था > जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक:
सुंदर माझा दवाखाना मोहिमेत सामान्य रुग्णालय, मालेगांव उपरुणालय कळवण, प्राचमक आरोग्य केंद्र मोहाडी ता.दिडोरी, उपकेंद्र बेला नाशिक
यांना कसे प्रदान करण्यात आले. > महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक: तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुधारक सन्मान उपक्रमात जिल्हास्तरीय निवड करण्यात आलेले पुरुष दुर्गेश कोते, पाने, ता.
मालेगांव. सुरेश गायकवाड, रोधाने, ता. सुरगाणा, वसंत पगार, कळवण, ता. कळवण
> कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई: विशेष सेवेसाठी सुरक्षारक्षक रामदास चिंतामण भाव यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह
देवून सन्मानित केले.
> महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील पदावर नामनिर्देशाने नियुक्ती ल्हासामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (क्रिया) डॉ. प्रमोद चौधरी, मालेगांव सामान्य रुग्णालयात बालरोगतज् डॉ. योगिता गायकवाड यांना नियुक्ती आदेश देण्यात आले.