सामान्य माणसाला भयमुक्त व सुरक्षिततेचे ठिकाण वाटेल असे काम करा :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…!

लाल दिवा -नाशिक, दि. १० फेब्रुवारी, २०२४

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सदैव नागरिकांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. या उक्तीप्रमाणेच सामान्य माणसाला भयमुक्त व सुरक्षितेचे ठिकाण वाटेल यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज शहरातील सातपूर पोलीस स्टेशन नवीन इमारतीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, किरण कुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनशिला अनावरण करून नुतन इमारतीचे उद्घाटन केले. ते म्हणाले, या नूतन इमारतीत अद्ययावत यंत्रणा व सेवा- सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आलेल्या आहेत. सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. पोलीस स्टेनशच्या सुंदर इमारतीसारखचे येथील अधिकारी व कर्मचारी निश्चितच उत्तम काम करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून 5 कोटींच्या निधीतून साकारलेल्या सातपूर पोलीस स्टेशन नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. या नवीन इमारतीमध्ये सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा आहेत. वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन, अंमलदार व तक्रारदारांसठीची स्वतंत्र दालन आहे. इमारत ही दुमजली असल्याने पोलिसांच्या कामाकाजाच्या दृष्टीकोनातून विभागवार सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.

 

यावेळी आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!