पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या…… वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी……!

पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष….!

लाल दिवा :

बांधकाम साइटवर शॉक लागून मृत्यू तर दुसरा एक गंभीर जखमी झाल्याचा प्रकार नुकताच इंदिरानगर भागात घडला. या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून केबिनच्या आत मध्ये जाण्या अगोदरच अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक देण्यात आली. ही काय धर्मशाळा आहे का? माझ्या केबिनमध्ये कसे काय येतात. असे म्हणत माध्यम प्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या बदलीची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आलेली आहे.

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत इमारतीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून एका कामगाराचा हकनाक मृत्यू झाल्याच्या घटने संदर्भात माहिती घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी भाई सोनार हे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे गेले. तसेच पोलीस निरीक्षकाकडे जाण्यापूर्वी ठाणे अंमलदार तसेच संबंधित तपासी अंमलदाराकडे या घटनेची माहिती विचारली असता त्यांनी टाळाटाळ केली. तसेच संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठ निरीक्षकांना जाऊन विचारा असे सांगितले. यावेळी माध्यम प्रतिनिधी पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पाय ठेवताच ही काय धर्मशाळा आहे का ? गेट आउट ! कोणीही येतं कोणीही जात ! अस म्हणत या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करीत माध्यम प्रतिनिधींचा अपमान केला. पोलीस निरीक्षकाला एवढा राग येण्याचे कारण काय ? याचा अर्थ या प्रकरणात दाल मे कुछ काला है ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर बाब पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर पडताच पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. सदर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता निर्माण करून कारवाईची मागणी केली आहे. तर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. सदर घटनेबाबत पत्रकार संघ आक्रमक झाला असून पत्रकारांचा वारंवार अपमान करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करून कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भाचे निवेदन उद्या पत्रकार संघाचे पदाधिकारी पोलीस आयुक्त, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री भारतीय पवार व राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देणार आहे.

 

 

 

एकीकडे पोलीस आयुक्त व पत्रकार यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होत असताना दुसरीकडे कनिष्ठ पोलीस अधिकारी पत्रकारांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार उघड झाल्याने सदर पोलिस निरीक्षकाच्या कार्यपद्धतीबाबत या निमित्ताने प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त नेमका काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!