रुग्णांच्या हक्कांची सनद दर्शनी भागात लावण्या बाबत दिपककुमार गुप्ता यांची मागणी
लाल दिवा, ता. २६ : दिपककुमार पी. गुप्ता यांनी राज्यातील सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद (द चार्टर ऑफ पेंशट राईटस) ही सनद मानवी हक्क आयोग भारत सरकार यांनी दि. १३ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. सदर रुग्णांच्या हक्काची सनद जशीचा तशी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्विकारलेली आहे तसेच राज्य सरकारनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थे मार्फत सदर सनद प्रत्येक रुग्णालयात लागु करावी असे निर्देशही केंद्र सरकारने दिलेले आहे या बाबत रुग्णालयांना फर्मान सोडले आहे. परंतु असे निर्दशनास आले आहे की, जळगांव जिल्हातील कोणत्याही खाजगी /शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रुग्णहक्काची सदर (द चार्टर ऑफ पेंशट राईटस) दर्शनी भागात लावल्याचे दिसून येत नाही असे त्यांनी त्यांच्या संदर्भ क्र. १ व ४ च्या तक्रार अर्जात नमुद केलेले आहे.
यास्तव संदर्भ क्र.२ व ३ नुसार आपणास सदर तक्रारी बाबत कळविण्यात आलेले होते तरी देखील आपल्या कार्यालयाकडून अदयाप पावतो प्रस्तत प्रकरणी कुठलेही कार्यवाही झालेली दिसून येते नाही तरी आपणास या पत्राव्दारे पुनश्चः कळविण्यात येते की, आपल्या संस्थेत व खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रुग्णहक्काची सदर (द चार्टर ऑफ पेंशट राईटस) दर्शनी भागात लावण्याबाबत आपल्या कार्यालयाकडून आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित रुग्णालयांना आदेशीत करावे व केलेल्या कार्यावाहीचा अहवाल विनाविलंब या कार्यालयास सादर करावा. अशी मागणी केली आहे