दीपक बडगुजर प्रकरण: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचा आवाज फुटला! प्रशांत जाधव यांना आव्हान! राज्यपालांच्या दारात धडकणार!

युवा नेते दीपक बडगुजर यांच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक; प्रशांत जाधव यांच्यावर गंभीर आरोप! राज्यपाल व पोलीस महासंचालकांना भेटणार!

नाशिक-नाशिक महानगरात अवैध व्यवसायिक आणि खंडणी खोरांसह अन्य गुन्हेगार व पोलीस यांचे संगणमत असून ठराविक पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्याविरोधात सुरु करण्यात आलेल्या खोट्या कारवाया थांबवाव्यात.तसेच महिलांना सुरक्षिततेची हमी मिळावी,अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे करण्यात आली असून त्या आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सादर करण्यात आले.याबाबत पोलिसांतर्फे योग्य ती पावले उचलली न गेल्यास महिला आघाडीला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

   ॲड.प्रशांत खंडेराव जाधव यांच्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात अंबड पोलिसांनी शिवसैनिक अंकुश शेवाळे याला ९ सप्टेबर २०२४ ला अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित,सराईत गुन्हेगारांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनाम करण्यासाठी त्यांचा मुलगा दीपक बडगुजर यास या गुन्ह्यात गोवण्याचा कट रचला जात आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या गोळीबार प्रकरणाचा गुन्हा सन २०२२ मध्ये दाखल झाला तेव्हा अंबड पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधिकारी श्रीकांत निंबाळकर यांनी फिर्यादी ॲड.प्रशांत जाधव याच्या सांगण्यावरून शंभरहून अधिक संशियतांची चौकशी केली होती. तेव्हा अंकुश शेवाळे,दीपक बडगुजर यांची नांवे समोर आली नाहीत.सुधाकर बडगुजर हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी अंकुश शेवाळे, दिपक बडगुजर यांना गोळीबार प्रकरणात गोवण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे हे स्पष्ट होत आहे. बडगुजर पिता-पुत्र यांची या प्रकरणात नावे घेण्यासाठी अंकुश शेवाळे याला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अमानुष मारहाण केली. दबाव टाकून मानसिक छळ केला.यावरून हि कारवाई राजकीय सुडापोटी केली असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणूक काळातही सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची बेकायदेशीर नोटीस काढून अटक करण्याचा प्रयत्न झाला होता.तीच कार्यपद्धती आता विधानसभा निवडूक डोळ्या समोर ठेवुन राबवली जात आहे. त्यासाठी प्रशांत जाधव, त्याचे साथीदार असलेले गुन्हेगार, साथीदार पोलिस कर्मचारी यांचे संगनमाताने बडगुजर यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे हा आमचा आरोप असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे 

    पोलीस कर्मचारी पवन परदेशी,संजय सपकाळ,उमाकांत टिळेकर,संजय करंजे यांच्यासह प्रशांत जाधव व सराईत गुन्हेगार यांनी संगतमताने अनेकांना ब्लॅकमेल करून खंडणी वसूल केली आहे व अनेक गुन्हे दडवलेले आहेत. पोलिस आयुक्तांचे खोटे सही शिक्के वापरून ड्रग्स प्रकरणामध्ये खंडणी वसूल केली आहे. स्वतःवरील गुन्ह्यांची माहिती लपवून पोलिसाच्या संगनमताने बंदुकीचा परवाना घेतला आहे. महिलावारील लैंगिक अत्याचाराच्या घटना या टोळीने दडविलेल्या आहेत. यासह या टोळीशी समंधित सर्व गुन्ह्यांची चौकशी होऊन सर्वांनवर कारवाई व्हावी. अशी आमची मागणी आहे. सर्व गुन्हांची माहिती या निवेदनात देत आहोत, असे हे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

   स्वतःला वकील म्हणून मिरवणारे प्रशांत खंडेराव जाधव हे गोळीबार प्रकरणातील फिर्यादी आहेत.संशयित आरोपी अंकुश लक्ष्मण शेवाळे यांना दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयामध्ये पोलीस रिमांडसाठी हजर केले असता न्यायालयामध्ये संबंधित पोली कर्मचारी आणि अधिकारी यांचे विरुद्ध पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीबाबत 

अंकुश याने तक्रार केल्या कारणाने न्यायालय आवरात प्रशांत खंडेराव जाधव य जमवलेले गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या सहकार्याने अंकुश लक्ष्मण शेवाळे यांची बहिण स्नेहल किशोर पाटील हिला दबाव टाकण्याकरिता अश्लील शिवीगाळ करून तसेच अश्लील स्पर्श करत मारहाण केली त्याची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दाखल आहे.गुन्हा क्रमांक ४८/ २०१९ देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल खंडणीच्या गुन्हाांत प्रशांत खंडेराव जाधव यास मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस ठेवण्यात आले होते. त्यासोबत गोळीबार प्रकरणातील श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या हा त्याच्यासोबत एका ठिकाणी सर्कल ५ मध्ये बंदिस्त होता. पूर्वीच आरोपीला ओळखत असलेल्या प्रशांत जाधव यांनी २०२२ मधील गोळीबार प्रकरणात श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या याला त्यावेळेस का ओळखले नाही. याबाबत संशय निर्माण होत आहे.तसेच सन २०२३मध्ये प्रशांत जाधव यांनी वकिली व्यवसायाची सनद मिळवण्यासाठी चारित्र्य पडताळणीच्या नामनिर्देशन फॉर्ममध्ये गुन्हेबाबतची माहिती हेतू पुरस्कर लपवून बेकायदेशीर पणे वकिली व्यवसायाची सनद मिळवली आहे.त्यामुळे त्यांची सनद रद्द करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. कुठल्या पोलीस स्टेशन मधून त्यास एनओसी मिळवली त्याची सुद्धा चौकशी करून कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे

   २४ मार्च २०१९ रोजी प्रशांत जाधव यांचेवर गुन्हा क्रमांक ४८/२०१९ अन्वये बेकायदेशीर कब्जा व खंडणीचा गुन्हा दाखल असतांना. पोलिसांची फसवणूक करून प्रशांत जाधव यांनी बंदुकीचा परवाना मिळवलेला आहे.याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. प्रशांत जाधव यांना बंदुकीचा परवाना मिळाल्यापासून आजपर्यंत अनेक लोकांना त्यांनी त्याचा धाक दाखवून बळजबरीने खंडणी वसूल केल्याच्या तक्रारी आहेत.यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केली आहे.जानेवारी २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक यांचे खोटे सही शिक्के वापरुन आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून नवीन नाशिक परिसरातील सामाजिक, राजकीय आणि प्रतिष्ठित लोकांकडून ललित पाटील ड्रग्स प्रकरणात खोट्या नोटिसा देऊन खंडणी वसूल केल्याचे प्रकार घडले आहेत.त्याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी यांचे विरुद्ध तक्रार दिलेली आहे. त्यावर चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेले होते.त्यामध्ये तपासी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नजन यांच्याकडे तपास देण्यात आला होता. पोलीस चौकशी 

दरम्यान दुव्यम पोलीस निरीक्षक नजन यांनी स्वतःवर२० फेब्रुवारी रोजी गोळी झाडून अंबड पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली आहे. त्याबाबत सखोल चौकशी व्हावी.प्रशांत जाधव यांनी पोलीस कर्मचारी पवन परदेशी आणि त्यांचे इतर साथीदार यांना ड्रग्स प्रकरणातून वाचवण्यासाठी अशोक नजन यांच्या वर दबाव टाकल्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.पोलीस तपासात मात्र ते स्पष्ट करण्यात आलेले नाही,असा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

    गोळीबार प्रकरणात प्रशांत खंडेराव जाधव यांच्या सांगण्यावरून २०हून अधिक मांस व्यापारी यांच्यावर संशय निर्माण झाला होता. मुळात प्रशांत जाधव मांस विक्रेत्याकडून वेळो-वेळी खंडणी घेत असल्यामुळे त्यांच्यावर संशय निर्माण झाला होता.खंडणी वसूल केल्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याबाबत पोलिसात स्वतंत्र तक्रार करण्यात जाणार आहे.

सन २०२२ मध्ये फिर्यादी प्रशांत जाधव यांच्या सांगण्यावरून संशयित युवती नामे मयुरी आणि तिच्या प्रियकरावर संशय निर्माण केला होता. प्रशांत जाधव यांनी मयुरी व तिचा प्रियकर आणि होणारा पती यांच्यावर संशय का घेतला याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.तसेच तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचीही चौकशी व्हावी,असेही दिवेदनात पुढे म्हटले आहे.

    दुसऱ्या एका प्रकरणात पिडीत महिलेने आपल्या प्रियकरा विषयी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.परंतु ही घटना गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असल्याने तेथे ३७६ अन्वये गुन्हा तेथे दाखल होता. या प्रकरणात ही प्रशांत जाधव व सहकारी यांनी नवीन नाशिक मधील प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तींकडून वेळोवेळी खंडणी मागण्यासाठी सदर महिलेचा वापर करून २५ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्याकरिता प्रशांत खंडेराव जाधव व त्याचे सहकारी यांनी महिलेला प्रोत्साहित करून खंडणी घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवर दबाव आणला होता. त्याबाबत पिडीत महिलेने शहानिशा झाल्या नंतर खुलासा केलेला आहे. त्याचे तांत्रिक पुरावे आमच्याकडे आहेत.सिडकोतील पवन नगर मध्ये १४ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री १२ वाजुन ३५ मिनिटांनी गोळीबार झाला होता. त्यात आरोपी रोहित मल्ल्या याच्या सोबत मुकेश शहाणे,भय्या गवई,धन्या बागुल, विशाल देशमुख, शुभम आरोटे हे सर्व सहभागी होते. यांना अद्याप अटक झालेली नाही. सुधाकर बडगुजर यांच्यावर गोळीबार करण्याचे मुकेश शहाणे याने सांगितले होते,असा जबाब आरोपी रोहित मल्ल्या याने अंबड पोलिसांना दिला आहे. हे सर्व पोलीस

रेकॉर्डवर असतांनाही या प्रकरणात गुन्हा दाखल करून मुकेश शहाणे यांना अटक व्हावी व कारवाई करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.प्रशांत जाधव वरील गोळीबार प्रकरणात राजकीय सुडापोटी अटक केलेल्या अंकुश शेवाळे यास पोलीस कर्मचारी पवन परदेशी, सचिन करंजे तपासी अमलदार शिरसाठ यांनी प्रशांत जाधव यांचे सांगण्यावरून अमानुषपणे मारहाण केली. पोलिसांचे प्रशांत जाधव याच्याशी हितसंबंध, संगनमत आहे हे त्यांच्या अनेक पार्ट्या आणि फोटो पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. तसेच न्यायालयानेसुद्धा मारहाण प्रकरणाची दखल घेतली आहे. अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे.वरील सर्व मुद्द्यांच्या आधारे पारदर्शी चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई व्हावी.महिलांना सुरक्षितेची हमी मिळावी.पोलीस प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा हि विनंती. यास संपूर्ण प्रकरणी पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास महिला आघाडी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडेल, इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.

      निवेदनाखालीलीलाबाई गायचनी,शितल भामरे,सीमा बडदे, सीमा डावखर,भारती पाईकराव,शिल्या चव्हाण,रंजना थोरवे, शोभा वालडे,चित्रा ढिकले,माधुरी चौधरी,वृषाली सोनवणे, योगिता गायकवाड,श्रुती नाईक,एकता खैरे, फैमिदा रंगरेज, द्वारका गोसावी,रंजनाताई बोराडे,वर्षा सूर्यवंशी,पुष्पा जाधव, अंजुम खान,शिवानी पाडे,नाझिया शेख, सुनिता कोठुळे,प्रियंका जोशी,स्वाती पाटील, मंगला आढाव आदींच्या सह्या आहेत.

 प्रतिक्रीया 

*मुकेश शहाणे ला अटक का नाही* 

  सिडको येथे14/12/23 रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी भाजपा नगारसेवक मुकेश शहाणे हा स्वतः आरोपी असतांना त्याला आटक का करण्यात आली नाही याचे कोडे उलगडत नाही 

*-स्वाती चव्हण* 

*शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक* 

 

प्रतिक्रीया 

   *राज्यपालांकडे दाद मागणार* 

   आम्हाला न्याय न मिळाल्यास राज्याच्या पोलिस महासंचालक रेश्मी शुक्ला व राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे दाद मागणार 

*-श्रुती नाईक*

*महिलाआघाडी महानगर संघटक*

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!