“डॅशिंग लेडी” मोनिका राऊत ॲक्शन मोडवर :…. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन …. गुन्हेगारांची धरपकड…. नागरिकांमध्ये समाधान..!

लाल दिवा-नाशिक,ता.२० :- श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली, अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा व त्याअनुषंगाने विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम तसेच प्रजासत्ताक दिनाचे पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, समाजकंटक चेक करणे, गुन्हयात पाहिजे/फरारी आरोपीतांना अटक करणे, टवाळखोरांवर कारवाई, इत्यादी करीता परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात दि. १९/०१/२०२४ रोजी ७.०० ते १०.०० वा. पावेतो कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले.

सदरचे कोम्बिंग ऑपरेशन  पोलीस आयुक्त नाशिक शहर, नाशिकरोड विभाग श्रीमती मोनिका  राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभागयांनी अधिनस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक कोम्बिगं ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.

 

  • १. रेकॉर्डवरील शरिरा विरुध्दचे तसेच तडीपार, असे एकुण १२३ गुन्हेगारांना चेक करुन, गुन्हेगारांचे चौकशीफॉर्म भरुन घेवून आवश्यक ती कारवाई करण्यांत आलेली आहे.

 

  • २. १७२ टवाळखोरां विरुध्द ११२/११७ प्रमाणे कारवाई केली आहे.

 

  • ३. देवळाली कॅम्प पोस्टे हद्दीत सराईत गुन्हेगारांचे घरझडतीत ०३ धारदार शस्त्रे जप्त करून कारवाई करण्यांत आली.

 

  • ४. समन्स/वॉरंट मधील इसमांना चेक करुन ०४ इसमांना वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.

 

  • ५. दारूबंदी कायदयान्वये इंदिरानगर व उपनगर या पोस्टे. हद्दीत एकुण ०२ केसेस / गुन्हे करण्यांत आले आहे. त्यात एकुण ८४७० रू.चा देशी विदेशी दारू साठा जप्त केला आहे.

रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार असल्याचे श्रीमती मोनिका नं. राऊतं, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!