दामिनीच्या शान, हेमंत तोडकर यांची कारवाई गाजली! टवाळखोरांना धडकी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या बळावर जेरबंद !

दामिनी पथकाच्या महिला पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन टवाळखोरांना सपोनि हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वात अटक

गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई: शाळा परिसरात टवाळकी करणाऱ्यांवर कारवाई करताना शिवीगाळ आणि अडथळा

लाल दिवा-नाशिक,दि.१३:- नाशिक: शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी होणारी टवाळकी व त्यावर कारवाई करणाऱ्या दामिनी पथकाच्या महिला पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन टवाळखोरांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ ने केली असून, या कारवाईत सपोनि हेमंत तोडकर यांनी नेतृत्व केले.

 

दि. ०९/०९/२०२४ रोजी महसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी दुचाकीवरून टवाळकी करणाऱ्या दोन तरुणांना रोखले. कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, त्या तरुणांनी शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दामिनी पथकाच्या तक्रारीवरून महसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त  संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त  प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त  संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींचा माग काढत असताना ते मखमलाबाद परिसरात असल्याची माहिती मिळाली. सपोनि हेमंत तोडकर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यांच्याच रचलेल्या सापळ्यात ऋतिक बबन ढोले (१९, रा. नवे धागुर, जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्हा कबूल केला आहे. दुसरा आरोपी ओंकार फकीरलाल लिलके (२२, रा. दरी मातोरी, जि. नाशिक) यालाही महसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

या कारवाईत पोउनि चेतन श्रीवंत, रविंद्र बागुल, पोलीस हवालदार संदिप भांड, शरद सोनवणे, नाझीम पठाण, प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, विशाल देवरे, अमोल कोष्टी, सुकाम पवार यांचा समावेश होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!