चोरी, वाहनचोरी, घरफोडी, जबरीचोरी या मालाविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेसाठी तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणेसाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन ….!
लाल दिवा -नाशिक,दि.२७:अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध | करणेसाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारां विरुद्ध कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्यादृष्टीने, | नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – २ मधील पोस्टे. हद्दीत दि. २६/१०/२०२३ रोजी १९.०० ते २२.०० वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविणे साठी श्रीमती मोनिका नं. राऊत, | पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर यांनी, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड व नाशिकरोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.
- श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व श्री. आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग | यांनी अधिनस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन कोम्बिगं ऑपरेशन | राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.
- १. रेकॉर्डवरील १०८ गुन्हेगार चेक करण्यांत येवून, त्यापैकी मिळून आलेले ५९ गुन्हेगार यांचे चौकशी फॉर्म भरण्यांत आलेले आहेत.
- २. ५० तडीपार गुन्हेगारांपैकी १५ तडीपार गुन्हेगारांना चेक केले असता, मिळून आले नाही.
- ३. इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड पोस्टे. हद्दीत ६९ वाहने चेक करुन मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणा-या १९ इसमां विरुध्द कारवाई करुन ९,५००/- रुपये दंड वसुल करण्यांत आला आहे.
- ४. इंदिरानगर व देवळाली कॅम्प पोस्टे हद्दीत कोटप्पा कायदयान्वये ०६ इसमां विरुध्द कारवाई करण्यात आली.
- ५. सातपूर, एमआयडीसी पोलीस चौकी, इंदिरानगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोस्टे. हद्दीत ७९ टवाळखोर इसमां विरुध्द मपोका. कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यांत आलेली आहे.
रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार असल्याचे, श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.