नाशिकमध्ये ‘गुन्हेगारीचे’ विसर्जन! सणांपूर्वी पोलिसांचा ‘धमाकेदार’ डाव, ३३ रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

  • शहरात शांतता भंग करण्याचा कट उधळला, ३३ रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

लाल दिवा-नाशिक,ता.९ :- शहरात गणेशोत्सव व ईद मिलाद हे सण शांततेत पार पडावेत यासाठी नाशिक पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून रेकॉर्डवरील ३३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. 

श्रीगणेशोत्सव आणि विसर्जन तसेच ईद मिलाद निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून घातक शस्त्रांचा वापर करून गुन्हे जसे की खून, दरोडा, मारहाण, नुकसान इत्यादी घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा चाबूक उचलला आहे.  

पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील परिमंडळ १ मधील १६७ आणि परिमंडळ २ मधील १९४ गुन्हेगारांना ७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पोलीस आयुक्तालय हद्दीत वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

गुन्हेशाखा युनिट, गुंडा पथक आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी मिळून मागील दोन दिवसात १८० हून अधिक संशयितांची तपासणी केली. त्यामध्ये खालील नावे असलेले ३३ जण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आढळून आले:

  • * दुर्गेश खंडागळे
  • * विशाल कोळी
  • * अमोल मल्ले
  • * सुजित पगारे
  • * अनिल पवार
  • * मयुर पवार 
  • * विक्की बजाज
  • * आकाश मोहिते
  • * दिपक वाघमारे
  • * आदित्य लष्करे
  • * विनायक लाटे 
  • * केविन आसर
  • * रोहित पगार
  • * समिर सैयद
  • * पंकज नरवडे 
  • * आसिफ शेख
  • * अरबाज बेग
  • * शौकत शेख
  • * गोपाळ सोनवणे 
  • * साई वाघमारे
  • * अमन खान
  • * विकार शेख
  • * किरण भामरे 
  • * इरफान ताकीम
  • * गुरूदेव देवले
  • * दर्शन डुगलज
  • * हरिप्रसाद जोशी 
  • * अजय रायकर
  • * अनिकेत देवरे
  • * पियुष शिंदे 
  • * बबलु यादव
  • * सद्दाम शेख
  • * निरंक नरोटे
  • * गणेश चव्हाण
  •  

वरील सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई येत्या काळातही सुरू राहणार असून, प्रतिबंधित क्षेत्रात आढळणाऱ्या रेकॉर्डवरील इतर गुन्हेगारांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!