गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी……जेष्ठ नागरीक महीलेस जखमी करून तीचे दागिने लुटणारा इसम जेरबंद……. खुनाचा गुन्हा उघडकीस….!
लाल दिवा-नाशिक,ता.१६ : दि.१ जानेवारी २०२४ रोजी दुपारच्या सुमारास सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर्स सामनगांव नाशिक या ठिकाणी जेष्ठ महीला नागरीक हिस गंभीर जखमी करून तीचे अंगावरील दागिने लुटुन नेल्याबाबत गंभीर गुन्हा घडला होता, सदर बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे ०३/२०२४ भादवि कलम ३९७, ५०६ मपोकाक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा जेष्ठ नागरिक महीले बाबत असल्याने तो तात्काळ उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णीक सो. यांनी नाशिकरोड पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने मा. पोलीस उपायुक्त श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ व ०२ व नाशिकरोड पोलीस ठाणे कडील पथकाने सातत्याने तपास करून गुन्हा घडला
परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासुन व तांत्रीक विश्लेषणव्दारे गुन्हा करणारा आरोपीची गोपनीय बातमीदारा मार्फत ओळख पटविली होती. त्यावर सदर आरोपीचे नाव विशाल प्रकाश गांगुर्डे असे असल्याचे निष्पन्न झाले होते. तो जेल रोड परिसारात राहत असल्याची माहीती तपासात मिळुन आली होती परंतु सदर परिसरातुन फरार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावर गुन्हे शाखा युनिट – १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोउनि / रविंद्र बागुल, पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, नाजीम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, यांचे पथक हे सतत रात्रंदिवस त्याचे मागावर होते, सदर आरोपी वेष बदलुन त्याच्या जागा व ठावठिकाणा बदलत असे, तो देवळा, कळवण, वापी-गुजरात, वाडा, विक्रमगड, जोगेश्वरी, विरार-भाईदंर अशा विविध ठिकाणी लपत होता, त्याचा मागोवा घेत, पाठलाग करीत असता तो कसारा येथे असल्याची बातमी सहा.पो.उप. निरी. बागुल यांना मिळाल्याने त्यास वरील पथकाने शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्यास गुन्हे शाखा युनिट-१ कार्यालयात आणुन चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
जुन २०२३ मध्ये लोखंडे मळा उप नगर पोलीस ठाणे हददीत एका जेष्ठ नागरीक महीला हीचे घरात घुसुन तीचे दोगीने लुटत असतांना तीला जिवे ठार मारले होते. सदरचा आरोपी हा अज्ञात होता. त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता. परंतु सदरच्या गुन्हयाची पध्दत व वर नमुद नाशिक रोड पोलीस ठाणे येथे घडलेल्या गुन्हयाची पध्दत एकच असल्याने गुन्हेशाखा युनिट ०१ च्या पथकाने कौशल्या वापरून नमुद आरोपीताकडे सातत्यपूर्ण सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली व सदरचे
https://twitter.com/nashikpolice/status/1747817758497112486?t=Imk_gunrhWhNLmEuPQgRnQ&s=19
गुन्हयाचे घटनास्थळ दाखविले, तसेच सदर गुन्हा कशा प्रकारे केला त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्याचे कडे त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत काय बाबत चौकशी करता त्याने त्याचे नातेवाईकांकडे चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीतास जुगार खेळण्याचा नाद होता, त्यासाठी त्यास पैशाची गरज असल्याने त्याने सदरचे गुन्हे केलेले आहेत असे निष्पन्न झाले. तसेच नमुद आरोपीने आणखी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे, सध्यस्थितीत नमुद आरोपीतास पुढील कारवाई कामी नाशिकरोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो. व मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत बच्छाव सो., मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे साो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ साो, सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोउपनि/चेतन श्रीवंत, विष्णु उगले, सपोउनि / रविंद्र बागुल, पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, नाजीम पठाण, विशाल काठे, महेश साळुंके, विजयकुमार सुर्यवंशी (दरोडा व शस्त्र पथक), प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी यांनी संयुक्त रित्या केलेली आहे…