गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी……उपनगर पो. ठाणे कडील पाहीजे असलेला आरोपी गुन्हेशाखा युनिट २ कडुन ताब्यात….!
लाल दिवा-नाशिक,ता .४ :- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, प्रशांत बच्छाव, पोलीस आयुक्त गुन्हे, सिताराम कोल्हे, नाशिक शहर यांनी उपनगर पो. ठाणे कडील गुरनं-५६/२०२४ भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील पाहीजे असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. +दि,०३) रोजी पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय बातमी मिळाली की, उपनगर पो. ठाणे कडील गुरनं-५६/२०२४ भादंवि कलम ३०७ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे प्रदीप उर्फ सोनू सोमनाथ कापसे वय-२८ वर्ष रा. एकलहरा पहाडी बाबा झोपडपटटी, नाशिक रोड हा एकलहरा परीसरात आला असल्या बाबत माहीती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विदयासागर श्रीमनवार, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळु शेळके, पोलीस हवालदार शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुनिल आहेर, प्रविण वानखेडे अशांनी एकलहरा येथे सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी उपनगर पो. ठाणेस हजर केले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळु शेळके, पोलीस हवालदार शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुनिल आहेर, प्रविण वानखेडे यांनी केलेली आहे.