गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी……. डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…. पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकांनी केले तोंड भरून कौतुक….!
लाल दिवा-नाशिक,ता.२६:-दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजेच्या सुमारास सातपुर एमआयडीसी येथे फिर्यादी मोहित कोतकर यांचा विश्वास संपादन करुन त्यांना २२ ग्रॅम वजनाची माळ सोन्याची असल्याची सांगुन त्यापोटी फिर्यादी यांचेकडुन २०,०००/- घेवुन फिर्यादी यांना खोटी सोन्याची माळ देवुन फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन दोघांविरुध्द सातपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं. २६/२०२४ भादविक ४२०,४१७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हा घडल्या नंतर फिर्यादी यांना सदरचे सोने खोटे आहे हे समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या संपर्कातील गंगापुर पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यावर पोनि सोनवणे यांनी त्यांना तात्काळ सातपुर पोलीस ठाणे येथे जावुन गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले व पोनि सोनवणे यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन सदर बाबतची माहिती ही गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ यांना दुरध्वनीवरून दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तात्काळ गुन्हेशाखा युनिट क १ कडील अधिकारी व अंमलदार यांना सांगुन गुन्हयाच्या घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले. सदर प्राप्त फुटेजद्वारे संशयित इसमांचा शोध घेण्याकरीता गुन्हेशाखा युनिट क१ च्या अधिकारी व अंमलदार यांचे पथके तयार करून त्यांना नाशिक शहरात सदर इसमांचा शोध घेण्याकामी पाठविले.
सदर संशयित इसमांचा शोध घेत असतांना गुन्हे शाखा युनिट क. १ चे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना फुटेज मधील संशयित इसम हे तवली फाटा येथे आढळुन आले. त्यावर त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांनी गुन्हेशाखा युनिट क १ कडील पोहवा / संदिप भांड, महेश साळुंके, पोना / मिलींद परदेशी, पोअं/ विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांना बोलावुन घेवुन त्या सर्वांनी मिळून दोन मोटार सायकलीसह सदर तीन संशयित इसम यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे नावे १) केशाराम पिता सवाराम, राह. बागरियोका वास, रानीवाडा, जिल्हा सांचोर, राज्यस्थान. २) बाबुभाई लुंबाजी मारवाडी, राह. आदीवाडा, मारवाडीवास, गांधीनगर, गुजरात. ३) रमेशकुमार दरगाराम राह. पोलीस ठाणा- बागरा, पो.स्टे. बागराच्या मागे, तहसिल बागरा, जिल्हा- जालोर, राज्यस्थान असे सांगीतले. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी वर नमुद गुन्हयाची कबुली दिली व तसेच ते राजस्थानवरून महिनाभरापुर्वी येवुन ते सर्व तवली फाटाच्या जवळील एका मोकळया जागी पालाच्या झोपडया उभ्या करून त्यात ते राहत असल्याचे सांगितले. तेथे राहुन ते दिवसभर रेकी करून नागरीकांना हेरतात. नागरीकांना हेरून त्यांना आम्हाला जमिनीत खोदकाम करतांना पुरातन सोने सापडले असुन ते आम्हाला कमी किमतीत विकायचे आहे असे सांगतो. हात चालाखीने आमचेकडे असलेले खरे सोने त्यांना दाखवुन खोटे सोने देत असतो अशी माहिती सांगुन गुन्हयाची कबुली दिली. पुढील तपासात त्यांचे झोपडीच्या पालातुन गुन्हयात वापरलेले मोबाईल, मोटार सायकल, खोटया सोन्याच्या विविध वजनाच्या व विविध आकाराच्या सोन्या सारख्या दिसणा-या पिवळया धातुच्या माळा, वजनकाटा, रोख रक्कम, सन १९०० मधील जुने चांदीचे कॉईन, व ख-या सोन्याचे २ मणी असा एकुण १,६२,२००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीनां पुढील कारवाई कामी सातपुर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
नाशिक शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरीकांची अशा प्रकारे फसवणुक झाली असल्यास त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाणेशी संपर्क साधल्यास अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउपनि/वेतन श्रीवंत, विष्णु उगले, सपोउनि/रविंद्र बागुल, पोहवा / संदिप भांड, महेश साळुंके, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, देविदास ठाकरे, पोना/ मिलींद परदेशी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोअं/ विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, नितीन जगताप, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, मपोअं/ अनुजा येलवे व चालक नाझीम पठाण अशांनी केलेली आहे.