गुन्हे शाखा १ च्या पोलिसांनी जीवावर उदार होऊन केली कारवाई……..बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तोल ताब्यात बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार केला जेरबंद ….. पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक….!
लाल दिवा : मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांवेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.
दिनांक ३०/०१/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोहवा /१०९ प्रविण वाघमारे व पोना/३७७ प्रशांत मरकड अशांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार मोहम्मद अरूण दिगंबर बिडगर हा सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे, ड्रिम कॅसलकडे जाणा-या रोडवर, नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल (कटटा) व जिवंत काडतुसे असे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहिती पोहवा /१०९ प्रविण वाघमारे व पोना / ३७७ प्रशांत मरकड अशांनी वपोनि श्री. विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा / १०९ प्रविण वाघमारे, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा / १८८३ विशाल काठे, पोहवा/९०० संदिप भांड, पोहवा /२२१ योगीराज गायकवाड, पोना / ३७७ प्रशांत मरकड व चापोहवा /१३१६ नाझीमखान पठाण अशांनी सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे, ड्रिम कॅसलकडे जाणा-या रोडवर, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सदर इसमाचे नांव अरुण दिगंबर बिडगर, वय-२६वर्षे, रा- केकाण चाळ रामवाडी, पंचवटी नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याचेकडुन ३०,०००/- रुपये कि.चे देशी बनावटीचे पिस्तोल, ०१ जिवंत काडतुसे ५००/-रूपये कि.चे असे हस्तगत करण्यात आले आहे.
सदरच्या इसमावर पंचवटी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ५/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हॅमत तोडकर, पोहवा /१०९ प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, योगीराज गायकवाड पोना / ३७७ प्रशांत मरकड, चापोहवा /१३१६ नाझीमखान पठाण, पोअं/२२६० जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी अशांनी केलेली आहे.