कोर्टाची स्टे ऑर्डर असतानाही महापालिका उठविणार अतिक्रमण ; जागा मालकाची पोलिसांकडे धाव
लाल दिवा : एकीकडे नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना त्याकडे सबसे दुर्लक्ष करत विशिष्ट ठिकाणीच विशिष्ट हेतू ठेवून अतिक्रमण उठवण्याचा घाट महापालिकेच्या काही कर्मचारी वर्गाने सुरू केला आहे. याची प्रत्यंतर आनंदवलीतील भागात दिसून येते. या भागांमध्ये एका ठिकाणी अतिक्रमण असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या ठिकाणी कोर्टाची स्टे ऑर्डर दाखवूनही संबधित आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण उठवू अशी दमबाजी सातपूर अतिक्रमण विभागाने संबंधितांना दिला आहे. त्यामुळे जागामालकांनी थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले आहे. त्यामुळे सोमवारी न्यायालयाचा अवमान करत अतिक्रमण उठवणार का ?
पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- प्रतिक्रिया
महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण विभागाची नोटीस आली आहे त्या संदर्भात कोर्टाच्या स्टे ऑर्डर मिळाला आहे तरी देखील आपले... आपल्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी म्हणतात की स्टे ऑर्डर वगैरे आम्ही काही मानत नाही कोर्टाची... अतिक्रमण विभागाचे अधिकारी म्हणतात आम्ही दिनांक १०/४ रोजी सकाळी ७ वाजता कारवाई करणार
कोर्टाचा अवमान झाल्यासारखे होईल.
जागा मालक
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1