रखडलेल्या रस्त्याच्या समस्येवरून भ्रष्टाचार निर्मूलन समिती आक्रमक; प्रशासनाला अंतिम ताकीद
भगूरचा रस्ता: सारिका नागरे, अरुणाताईंचा संघर्ष रंगणार?
लाल दिवा-नाशिक, दि. ३० नोव्हेंबर २०२४ – विजयनगर, भगूर येथील भयावह रस्त्याच्या समस्येवरून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. समितीने आज पोलीस उपायुक्त कार्यालयावर धडक देत प्रशासनाला अंतिम ताकीद दिली. समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. अमोलभाऊ भागवत आणि प्रदेश सरचिटणीस सौ. सारिकाताई नागरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाकडे आपली तक्रार नोंदवली.
गेल्या चार महिन्यांपासून शिवनेरी नगर आणि विजयनगर येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून वाहने चालवणेही धोकादायक बनले आहे. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप समितीने केला आहे.
रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या एका जागा मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे. २८ नोव्हेंबर रोजी छावणी परिसरातील डे. कॉम्प प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू केले होते, परंतु संबंधित जागा मालकाने पोलिसांचे संरक्षण असतानाही काम बंद पाडले. रस्त्यावर माती आणि मुरूम टाकून तो जाणूनबुजून अडथळे आणत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यावेळी समितीचे प्रमुख पदाधिकारी सौ. अरुणाताई मातंग, सौ. कुंदाताई पवार, सौ. रेखाताई निकुंभ, सौ. सुवर्णाताई उदावंत, सौ. किर्तीताई उदावंत, श्री. दिनेशदादा झुटे, श्री. राकेश तेलोरे, श्री. सुभाषभाऊ ठुबे, श्री. रमेश चेवले, श्री. दिलीप गायकवाड, श्री. विजय गांगुर्डे, श्री. प्रकाश जगताप, श्री. संजयनाना बलकवडे, श्री. श्याम डावरे, श्री. अविनाश वाघ, श्री. पांडुरंगशेठ ओहोळ, सौ. राजश्रीताई गायकवाड, श्री. अरुणभाऊ चव्हाण, श्री. सुनील पाटील, श्री. राजूभाऊ शिरसाठ, श्री. बिस्मिल्ला खान आणि श्री. संजय शिंदे आदी उपस्थित होते.