कंबाईन पोलिस उप निरिक्षक २०२० परीक्षा सर्वसाधारण गुणवत्ता यादी कधी लागणार

लाल दिवा, ता. २८ : कंबाईन पोलिस उप निरिक्षक २०२० या जाहीरातीमधील सर्व परीक्षा प्रक्रिया पूर्ण केलेले परीक्षार्थी आहोत . [ पूर्व + मुख्य + मैदानी चाचणी + मुलाखत ] सदरील जाहीरातीच्या मुलाखती दिनांक ०८/०३/२०२३ ते २५/०३/२०२३ या कालावधीत पूर्ण झालेली असून आम्ही अद्यापपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादी ( अंतिम निकाल) प्रतिक्षेत आहेत . 

याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाकडून मिळालेल्या माहीतीनुसार आमचा अंतिम निकाल मा . आयोगाने SEBC TO EWS रूपांतरीत आरक्षणामुळे थांबविला आहे , जे की कंबाईन ( PSI / STI / ASO ) २०२० या जाहीरातीमधील STI व ASO चा अंतिम निकाल लागून याच जाहीरातीमधील उमेदवार सेवेत रुजू झाले आहेत . परंतु फक्त PSI साठीचा सर्वसाधारण गुणवत्ता यादी व अंतिम निकाल SEBC TO EWS रूपांतरीत आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत थांबविला आहे . जे की वरील जाहीरात एकच आहे व या जाहीरातीमध्ये पूर्व परिक्षेपासून मुलाखती पर्यंत सर्व प्रक्रिया EWS आरक्षणानुसार कायदेशीरदृष्टया सुरळीत पार पाडण्यात आलेली आहे .

 

 आम्हांला कळालेल्या माहीतीनुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१ ९ या जाहीरातीतील मुख्य परीक्षेच्या निकालानंतर SEBC TO EWS रूपांतरीत आरक्षण हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व त्याचा परिणाम म्हणून दिनांक २३/१२/२०२० चा शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने रद्द ठरविला आहे . वरील शासन निर्णया अंतर्गत येणा – या इतर सर्व १२ जाहीरातींवर त्याचा परिणाम होणार आहे , ज्या की त्यामधील PSI 2020 जाहीरातीमधील परीक्षार्थी सोडून इतर सर्व जाहीरातींचे अंतिम निकाल लागून ते उमेदवार सेवेत रुजू झालेले आहेत . समस्या फक्त PSI 2020 परीक्षार्थीना येत आहे .

 

 कंबाईन PSI 2020 या जाहीरातीची संपूर्ण प्रक्रियेला ३ वर्षांचा कालावधी लोटलेला आहे व मा . मुख्यमंत्री महोदयांनी विधी मंडळात दिलेल्या माहीतीनुसार मुलाखत झाल्याच्या अंतिम दिवशी अंतिम निकाल तातडीने जाहीर करण्यात येईल . त्यांच्या आश्वासनानुसार ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही . या जाहीरातीमधील प्रक्रिया ही पूर्व परीक्षेच्या आधीपासून SEBC TO EWS रूपांतरीत आरक्षणानुसार झालेली असतानाही आम्हांला या समस्येला तोंड दयावे लागत आहे . 

 

सदरील विषयात आपण तातडीने लक्ष घालून किमान सर्वसाधारण गुणवत्ता यादी कींवा अंतिम निकाल जाहीर करून परीक्षार्थींना पुढील वाटचालीसाठी दिशा मोकळी करून देण्यात यावी , ही कळकळीची नम्र विनंती . 

 

आपले नम्र सर्व उमेदवार PSI २०२०

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!