सिव्हिल हॉस्पिटलच्या लिपिकास पाच हजाराची लाच घेताना अटक…!

लाल दिवा : अतिष छगन भोईर वय ४५ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद कनिष्ठ लिपीक, वर्ग ३, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक रा. मानसी व्हिला बी, रो हाउस नंबर ३, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक

लाचेची मागणी-५,५०० लाच स्विकारली ५,०००/-

हस्तगत रक्कम-(दि.०७)जुन २०२४ तक्रार:-तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे सिझरींग झालेले औषधोपचाराचे हॉस्पीटल खर्च ९२,३७९ रुपयाचे वैदयकिय बिल मिळणेकामी वैदयकिय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता,आरोपी लोकसेवक यांनी वैदयकिय बिलाची फाईल पुढील कारवाई करुन लवकर आणुन देणेकरीता तक्रारदार यांचेकडे एकुण बिलाचे ६ टक्के प्रमाणे ५,६०० रुपयाची लाचेची मागणी करुन, तडजोडअंती पंचा समक्ष ५,००० रुपये लाचेची मागणी करुन, सदर ५,०००रुपये लाचेची रक्कम(दि,०७)२०२४ रोजी १८:०० वा. चे सुमारास पंच साक्षीदारा समक्ष सामान्य रुग्णालय, नाशिक येथील प्रशासकिय कार्यालयातील त्यांचे कक्षेत स्विकारतांना रंगेहाथ पकडले असून यातील आलोसे यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.

 यांचे सक्षम अधिकारी-मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, नाशिक हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
1
+1
3
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!