गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी शहर पोलीसांचा अभिनव उपक्रम…… दिवसा कोबींग ऑपरेशन राबवुन केली सराईत गुन्हेगारांवर कारवाई….!
लाल दिवा : पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे नेतृत्वाखाली दिनांक ०६/०६/२०२३ चे रोजीचे १८.०० ते २० ०० वाजे पावेतो नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात चैनस्नॅचींग / जबरी चोरी, घरफोडी तसेच शरिराविरूध्द व मालाविरुध्द गुन्हे करणारे सर्व पोलीस ठाणे च्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांचे राहण्याचे संभाव्य ठिकाण चेक करुन त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणुन त्यांच्याकडे चौकशी करुन योग्य ते प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार मा. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व २ नाशिक शहर यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे कडील डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हेशाखेकडील युनिट – १ व युनिट-२ मधील अधिकारी व अंमलदार यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांची माहिती घेवुन गुन्हेगारांचा रहिवास व वावर मोठया प्रमाणात आहे अशा ठिकाणी अचानकपणे दिवसा कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले.
कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलीस आयुक्तालय हददीत चैनस्नॅचींग / जबरी चोरी, घरफोडी तसेच शरिराविरुध्द व मालाविरुध्दचे सराईत गुन्हेगार हिस्ट्रीशिटर, टवाळखोर, भारतीय हत्यार कायदयाचे उल्लंघन करणारे इसम अशा १५४ गुन्हेगारांविरुध्द कोबींग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हेशाखेकडील पथकाने २ अटट्ल गुन्हेगार यांना ताब्यात घेतले असुन त्यांचेकडे गुन्हयांचे अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे. यापुढेही पोलीस आयुक्तालय हद्दीत वेळोवेळी अचानकपणे दिवसा कोम्बींग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्हयांना प्रतिबंध तसेच अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीसांमार्फत शक्यतो रात्रीच्या वेळेस कोबींग ऑपरेशन / ऑल आउट अथवा विशेष मोहिम राबविले जात असल्याने गुन्हेगांर बहुतेक वेळा हे रात्रीच्या वेळी घरी मिळुन येत नाहीत. मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतुन गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी दिवसा कोबींग मोहिम राबवुन प्रभावी कारवाई करण्यात आली. तसेच दिवसा कोबींग मोहिमे राबववितांना पोलीसांचा जनतेशी संवाद साधुन आरोपीतांच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेता आली. तसेच दिवसा कोबींग ऑपरेशन राबविल्याने जनतेमध्ये पोलीसांबाबत विश्वासार्हता निर्माण झाली.
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उप आयुक्त, ५ सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच गुन्हेशाखेकडील युनिट – १ व २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार अशांनी दिवसा कोबींग ऑपरेशन राबविणेकामी सहभागी होवुन कारवाई केली. आहे.