जिल्हा विकास आराखड्यासाठी नागरिकांनी 31 मे पर्यंत अभिप्राय नोंदवावे जिल्हाधिकारी गंगाथरन डी…!

लाल दिवा – नाशिक, दिनांक : 12 मे, 2023 जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनामधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांनासमोर जाण्याची आवश्यकता विचारात घेवून प्रत्येक जिल्ह्यासाठी ‘जिल्हा विकास आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. या सर्व समावेशक विकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था व आस्थापनांनी आपले अभिप्राय 31 मे 2023 पर्यंत कळवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

 

केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला 2047 पर्यंत ‘विकसित भारत – भारत @2047 (India@2047) करण्यासाठी संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा विकास आराखडा तयार करतांना जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य संधी लक्षात घेवून त्यानुसार गुंतवणूक व विकासाला चालना देणाऱ्या बाबी तसेच कृषी व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्माण सह), जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन इत्यादी क्षेत्रांतील वृद्धी करण्याबाबत नागरिकांचे अभिप्राय जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिक, संस्था व आस्थापना यांनी dponashik@gmail.com या इमेलवर लेखी स्वरूपात आपले अभिप्राय 31 मे 2023 पर्यंत कळविण्यात यावेत.

 

भारताला 2047 पर्यंत ‘विकसित भारत – भारत @2047 (India@2047) केंद्र सरकारकडून संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट जाहिर करण्यात आले असून 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दीष्ट साध्य करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. विकसित भारताची ही उद्दीष्टे साध्य करतांना देशातील राज्यांनी देखील 2047 पर्यंत संपूर्ण विकसित होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आपल्या राज्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन व 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचविण्याचे राज्याचे मुख्य ध्येय आहे. राज्याचे अर्थव्यवस्थेचे ध्येय साध्य करतांना जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वसमावेशक व शाश्वत विकासाची उद्दीष्टे साध्य करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सर्व नागरिक, संस्था व आस्थापनांनी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आपले अभिप्राय वर नमूद केलेल्या इमेलवर 31 मे 2023 पर्यंत कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!