चिमुकलीच्या पोटात कॉइन, उपचारासाठी हात मजुराकडे पैशाअभावी आक्रोश
मदत करा! चिमुकलीला वाचवा!!
लाल दिवा-नाशिक,सिडको, ता. ७ (प्रतिनिधी) – हातमजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या सहा वर्षीय मुलीने अचानक एक रुपयाचा कॉइन गिळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. कॉइन पोटात असल्याने मुलीचा जीव धोक्यात असून समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.
सिडकोतील शुभम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणारी सहा वर्षीय दिया (नाव बदलले आहे) ही आई पाणी भरत असताना खेळत होती. या दरम्यान तिने अचानक एक रुपयाचा कॉइन गिळला. काही वेळाने तिला उलट्या सुरू झाल्या. आईने विचारपूस केल्यावर तिने कॉइन गिळल्याचे सांगितले. घरात एकच हाहाकार माजला. वडील कामावर असल्याने शेजारीणनी मदत करत तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. एक्स-रेमध्ये तिच्या पोटात कॉइन असल्याचे स्पष्ट झाले.
डॉक्टरांनी कॉइन काढण्यासाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च येईल असे सांगितले. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम अशक्यप्राय होती. निराश होऊन कुटुंबीयांना तिला घरी आणावे लागले. सध्या घरगुती उपचार सुरू असले तरी मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबियांनी समाजाकडून आर्थिक मदतीची याचना केली आहे.
- एक्स-रेमध्ये दिसणारा दियाच्या पोटातील कॉइन
-
सहा वर्षीय दियाचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.
-
कॉइन गिळल्याने तिचा जीव धोक्यात आहे.
-
उपचारासाठी समाजाकडून मदतीची अपेक्षा.
- प्रतिक्रिया
“वेळीअवेळी पाणी येत असल्याने नेहमीच गोंधळ उडतो. गुरुवारी अचानक कमी दाबाने पाणी आले. पाणी भरण्यात लक्ष असल्याने मुलीकडे दुर्लक्ष झाले. तेवढ्यात तिने कॉइन गिळला. डॉक्टरांकडे गेलो खरा, पण खर्च खूप जास्त होता. नाईलाजाने तिला घरी आणावे लागले. उपचारांसाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”– दियाची आई-9975408976 मनिषा अलगट – शुभम पार्क