बाल आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी ओढले बालगृह अधिकाऱ्यांवर ताशेरे….दोन अनाथ मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यभर तापले….. पालखेडकर यांच्या ताठर भूमिकेचे नागरिकांनी केले स्वागत……!
लाल दिवा-नाशिक,ता.१३ : “वर्धा”लैंगिक अत्याचार सरकारी बालगृहातील दोन अनाथ मुले आता राज्यस्तरीय मुद्दा बनत आहेत. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याने पाटणकर चौकातील सुविधेला भेट दिली. अधिकाऱ्यांना मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व पीडितांचे वैद्यकीय रेकॉर्ड आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर अहवालात सादर करण्यास सांगितले आहे. तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सदस्या सायली पालखेडकर वर्धा येथील कार्यक्रमानिमित्त नागपूरला आले होते. नागपूरच्या बालगृहात लहान मुलावर अत्याचार झाल्याची घटना कळताच पालखेडकर यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाची सदस्य या नात्याने आयोगाच्या अध्यक्षा आणि मंत्री महोदयांच्या वतीने ताबडतोब स्वतः भेट दिली. तेथील परिस्थिती आणि अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच तेथे आढळलेल्या त्रुटी जश्या की मुलासाठी खेळाची साधने, भांडी, जेवणाच्या गैरसोई, पाण्याची कामतरता, इत्यादी अडचणी आढळून आल्या त्या तातडीने कश्या दूर करता येतील त्या बाबत सूचना व मार्गदशन केले. तसेच मुलाची सुरक्षा जशी की खेळतांना भांडणे होऊ नयेत, मुळे इमारतीच्या वर जाणार नाहीत. विजेवर चालणारे वॉशिंग मशीन, गिझर या वास्तूशी मुलांचा सरळ सबंध येणार नाही. ही सगळी कामे तेथील केअर टेकर करावीत. अशी सूचना दिली. मुलांच्या करमणूकी साठी मुलांना विविध खेळ आणि छंदात त्यांचा वेळ चांगल्या कामात आणि मनोरंजक गोष्टीत कसे रमेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले. तसेंच त्या कथित आत्याचार ग्रस्त मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे त्याचा अहवाल आल्यावरच त्यावर बोलणे योग्य होईल. या घटनेला जबाबदार असणाऱ्या आणि ज्या घटकाच्या दुर्लक्ष्या मुळे हा प्रकार घडला त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आयोगाकडून पाठपुरावा करण्यात येईल. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल मा. मंत्री महोदया आणि आयोगाच्या अध्यक्ष यांना सादर केला आहे. असेही सायली पालखेडकर म्हणाले.