मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला भाऊसाहेब कांबळेवर भरवसा नाही काय?

मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तरी आदेश फाट्यावर मारत निवडणूक लढविणार – भाऊसाहेब कांबळे

लाल दिवा-श्रीरामपूर,दि. राज्यातील निवडणुकीच्या तयारी जोरात सुरू असताना श्रीरामपूर मतदारसंघात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुतीने दोन उमेदवार रिंगणात उतरवल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही उमेदवार काँग्रेस विचारसरणीचे असल्याने हिंदुत्वाची ओळख कुठेही दिसत नाही, यावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत आजची श्रीरामपूरमधील सभा रद्द केली आहे. सभा रद्द झाल्यानंतर उमेदवार भाऊसाहेब कांबळे इस्पितळात दाखल झाले आणि पत्रकारांना बाइट देत मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले. “मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तरी फाट्यावर मारून मी निवडणूक लढणारच,” असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

कांबळेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती उमेदवार आणि शिंदे सेनेमध्ये आलबेल नसल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री उमेदवार बदलणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!