चेन स्नॅचिंगचा सम्राट जेरबंद! अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगारास अटक, नाशिक पोलिसांची धाडसी कामगिरी
गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी, चैन स्नॅचिंग रॅकेटचा पर्दाफाश
लाल दिवा-नाशिक,दि.८:- विशेष प्रतिनिधी-नाशिक शहरात दहशत निर्माण करणारा, चैन स्नॅचिंगचा बादशहा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या धाडसी कारवाईत सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणेला अग्निशस्त्रासह जेरबंद करण्यात आले. या कारवाईने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ ने हे यश मिळवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि श्री. हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोउनि चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन या कारवाईला यशस्वी केले. या पथकात पोहवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदिप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, महेश साळुंके, शरद सोनवणे, उत्तम पवार, रविंद्र आढाव, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, पो. अं. आप्पा पानवळ, राम बर्डे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, मपो. अं. मनिषा सरोदे, अनुजा येलवे, चालक श्रेणीपाउनि किरण शिरसाठ, सुकाम पवार यांचा समावेश होता. तसेच, पंचवटी पोलीस ठाण्यातील सपोनि श्री. विलास पडोळकर, पोहवा नांदुर्डीकर, दिपक नाईक, पो.अं. घनशाम महाले, मपोअं. पूजा गवारे यांनीही या कारवाईत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सोनवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिक शहर आणि ग्रामीण भागात एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना सोनवणेच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानुसार पंचवटीतील अश्वमेघ नगर येथे त्याच्या घरासमोर सापळा रचण्यात आला.
पोलिसांना पाहताच सोनवणे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या चपळाईमुळे तो पकडला गेला. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. सोनवणेला अटक करताना त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात पो.अं. अमोल कोष्टी जखमी झाले आहेत. सोनवणेलाही दुखापत झाली असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोनवणे आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.