शिक्षक व कर्मचारी बोगस भरती प्रकरणाबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात हिरे यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल …!
लाल दिवा-नाशिक,दि.४ : हिरे कुटुंबियांच्या संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक व शिपाई यांनी संगनमत करून शासनाकडून वेतनापोटी लाखो रुपये वसूल केले आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी हाताशी धरून हा आर्थिक घोटाळा केल्याने शिक्षण वर्तुळासह राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील महात्मा गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील 25 पदाधिकारी, सदस्य, तत्कालीन मुख्याध्यापक, 22 शिक्षक, 12 शिपाई व 6 लिपीक यांनी 1 जानेवारी 2008 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सगळ्यांनी संगनमत करून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे मान्यतेचे प्रस्ताव पाठवले. त्यांनीही कोणतीही शहानिशा न करता आणि राजकीय ताकदीमुळे नियमबाह्य मान्यता दिली. परिणामी, शासनाची वेतनापोटी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
- भद्रकाली पोलीसस्टेशन, नाशिक शहर येथे फिर्यादी डॉ. किरण जयप्रकाश कुंवर शिक्षण उप निरिक्षक यांनी समक्ष
- जयश्री राजेंद्रसिंग लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, सावता नगर, सिडको लिपीक सोनवणे आकाश दौलतराव केबीएच विद्यालय, वडाळा तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रविण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दिनांक ०२/११/२०२३ रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे फिर्यादी डॉ. किरण जयप्रकाश कुंवर शिक्षण उप निरिक्षक यांनी समक्ष उपस्थित राहून सरकारी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक १/९/२००७ रोजी ते दिनांक ०२/११/२०२३ रोजी पोवती जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नाशिक शहर या ठिकाणी महात्मा गांधी विद्या मंदिर, नाशिक या संस्थेच्या माध्यमिक शाळाचे कालीन संचालक मंडळ एकूण २५ पदाधिकारी व सदस्य तत्कालीन मुख्याध्यापक यानी एकुण २२ शिक्षक, १२ शिपाई लिपी अशांनी संगनमत करून नियमबाह्य जिल्हा परिषदेस मान्यतेचे प्रस्ताव पाठवुन तत्कालीन शिक्षणा अधिकारी (माध्यमिक) श्री प्रविण पाटील यानी नियमबाहय मान्यता देवून फसवणुक केली व वेतनापोटी रुपये लाखो रुपयांचा अपहार करुन शासकीय निधीचा अपव्यय केला आहे.