बुलेट राजांसमोर पोलीस राजा हतबल ?….. कर्णकर्कश आवाजाचे कौतुकसोहळे… यांची हवा कोण काढणार ? वाहतूक व ध्वनीप्रदूषण नियम धाब्यावर…!
लाल दिवा : बुलेटच्या मूळ सायलेन्सरला मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाजात बुलेट चालवून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविण्याचा ट्रेंड हल्ली नाशिकमध्ये चांगलाच रुळत आहे. अगदी छोट्या कॉलोनी परिसरात देखील या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वात जास्त लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे . सिग्नल तोडून भरधाव वेगात वाहन चालवून वाहतूक नियम तोडत फाटक्या तसेच फटाक्यांच्या आवाजाचा प्रसाद शहरभर हि मंडळी बेदरकारपणे वाटत आहे ? प्रश्न हा आहे कि यांच्यावर कारवाई का होत नाही? यांच्या गाड्यांची हवा काढण्याची तसेच सायलेन्सर जमा करून दण्डात्मतक कारवाई करण्याची हिम्मत वाहतूक विभाग दाखवेल का? कि निर्विकारपणे नागरिकांनी हे सर्व सहन करायचे …
काही निशाचर रात्रभर फिरून दिवसभर दमलेल्या कष्टक-यांच्या झोपा मोडतात. लहान लेकरं झोपेतून दचकून उठतात. सर्वात जास्त ह्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास ज्येष्ठ नागरिक सहन करत आहे. आवाजाचे सोहळे साजरे करताना वेग हवाच म्हणून रस्त्यावर अगदी बापानेच बांधला अशा अर्विभावात गाडी चालवतात.
ह्या मंडळींना एकच सांगणे कि बाळांनो …. तुम्ही जातात झान्ग करून पण त्यानंतर मागचे लोक तुमच्या माता भगिनींची प्रचंड आठवण काढतात हे पण लक्षात ठेवा !