मोक्यातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा !
लाल दिवा, ता. ९ : पंचवटी पो.ठाणेकडील भादंवि कलम ३०७, ३८४, ३८५, ३८६, ३८७, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब), ४२०, ४६५, ४६८, ४७१, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्टचे कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (), (३(२), ३(४) (विशेष मोक्का खटला. गुन्हयातील आरोपीतांना जन्मठेप व प्रत्येकी १०,०००/- रुपये दंडाची शिक्षा. क्रं.०४/२०१७)
सदरचा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील पंचवटी पोलीस ठाणेच्या हद्दीत दि. २९.०६.२०१७ रोजी १४.४० वाचे. सुमारास डॉ. बच्छाव हॉस्पीटल शेजारी, हॉटेल श्रीकृष्ण विलास समोर, पेठ रोड, पंचवटी, नाशिक येथे घडलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १) शेखर राहूल निकम, वय २७ वर्षे, रा. राजये अपार्टमेंट, मेहरधाम, पेठरोड पंचवटी,
नाशिक, २) केतन राहूल निकम, वय १९ वर्षे, रा. निकम निवास, पेठरोड, पंचवटी नाशिक, ३) संतोष प्रकाश पवार, वय १९ वर्षे, रा. मरिमाता मंदिर, पंचवटी, नाशिक, ४) विशाल चंद्रकांत भालेराव, वय २६ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी, रविवार पेठ, नाशिक, ५) संदिप सुधाकर पगारे, वय २९ वर्षे, रा. रवि किरण बिल्डींग शेजारी, भेंडीचाळ, पेठरोड नाशिक यांनी जखमी संदिप अशोक लाड वय २९ वर्षे, यास जिवे ठार मारण्याचा कट रचून गैरकायदयाची मंडळी जमवून जखमी संदिप लाड याचेकडून वेळोवेळी खंडणी मागवून सदर खंडणीस जखमी संदिप लाड याने विरोध केला असता त्याचा राग मनात धरुन रिव्हॉलवरने जखमी संदिप लाड याचे छातीचे उजवे बाजुस गोळी मारुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन दहशत निर्माण केली म्हणून आरोपीतांविरुध्द पंचवटी पोलीस ठाणेत भादंवि. कलम ३०७, ३८४, ३८५, ३८६, ३८७, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), ४२०, ४६५, ४६८, ४७१, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट ” अॅक्टचे कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३, (१),(३(२),३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास डॉ.राजु भुजबळ, सहा. पोलीस आयुक्त, तत्कालीन नेमणुक विभाग-०२, नाशिक शहर व के.डी. वाघ, सहा. पोलीस निरीक्षक तत्कालीन नेमणुक पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरूद् सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन अतिशय चिकाटीने तपास केला व आरोपींविरुध्द् मा. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी मा. विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०२, नाशिक येथे सुरू होती.
आज दिनांक ०९/०५/२०२३ रोजी श्रीमती ए. यु. कदम, विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०२, नाशिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी क्रमांक १) शेखर राहूल निकम, वय २७ वर्षे व २) केतन राहूल निकम, वय १९ वर्षे, यांना सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये खालील प्रमाणे शिक्षा सुनावलेली आहे.
१. आरोपी क्रमांक १ व २ यांना भादंवि कलम ३०७ मध्ये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी १०,०००/-रुपये दंड, दंड न भरल्यास ०१ वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून डॉ. सुधिर कोतवाल यांनी कामकाज पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा. / ४१५ एम एम पिंगळे नेमणुक पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर व कोर्ट अंमलदार सपोउनि. के. के. गायकवाड, नेमणुक अभियोग कक्ष, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.
वरील गुन्हयातील तपासी अंमलदार, पैरवी अधिकारी व कोर्ट अमलदार यांनी गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. पोलीस आयुक्त व मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे व मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ- १, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा व प्रभारी अधिकारी, अभियोग कक्ष, नाशिक शहर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..