महाशिवपुराण ऐकण्यासाठी निघालेला बिबट्या जेरबंद…!

लाल दिवा-नाशिक,ता.२३ : पाथर्डी शिवारामध्ये आज सकाळच्या वेळी एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या बिबट्याला पुन्हा वनवासात सोडले जाणार आहे. आज पहाटेच्या सुमारास शहरातील मौजे पाथर्डी येथील संजय गंगाधर नवले यांच्या मालकीच्या नवले मळा यांचे मालकी गट नंबर २१६ मध्ये लावण्यात आलेल्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे .

 

वन्यप्राणी बिबट्या वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरीत्या आहे. दरम्यान, येथून जवळच असलेल्या पाथर्डीमध्येच शिवपुराण कथा सोहळा सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि त्याच परिसरातबिबट्या जेरबंद झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तर काहींनी हा बिबट्या महाशिवपुराण ऐकण्यासाठी निघाला असल्याचे विनोदाने म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!