भुजबळ समर्थक गजू घोडके यांचे आमरण उपोषण संपन्न…!
लाल दिवा-नाशिक: सिडको, ता. १८ : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षण समर्थनार्थ सुवर्णकार समाजाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतले आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे याबद्दल दुमत नाही. परंतु ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होता कामा नये. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या समर्थनार्थ सुरू केलेल्या जाहीर सभा यांना आमचे समर्थन असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी द्यावे. याकरता सुवर्णकार समाजाच्या वतीने ओबिसी प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. घोडके यांनी उपोषणास केले होते. काही मान्यवरांच्या आग्रहास्तव श्री. घोडके यांनी चौथ्या दिवशी पाणी पिऊन हे उपोषण सोडले आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी ओबीसी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चार दिवस मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
- फोटो
नाशिक : चौथ्या दिवशी पाणी पिऊन उपोषण सोडताना सुवर्णकार समाजाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष गजू घोडके व समर्थक