भारतीय जनता पार्टी, आरएसएस प्रणीत व जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्र आयोजीत……. डी-लिस्टिंग महामेळावा यावर……. नाशिक उलगुलान मोर्चा, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, आदिवासी शक्ती सेना जाहीर बहिष्कार….!
लाल दिवा -नाशिक,दि.२८: जय आदिवासी..जय राघोजी..जय बिरसा..जय एकलव्य. नाशिक गोल्फ क्लब मैदान येथे होत असलेल्या भारतीय जनता पार्टी व आरएसएस प्रणीत जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्र आयोजित डी-लिस्टिंग महामेळावा यावर नाशिक उलगुलान मोर्चा, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, आदिवासी शक्ती सेना जाहीर बहिष्कार टाकत आहे.
या पत्रकात जनजाती सुरक्षा मंच आदिवासींच्या संस्कृती परंपरेला सनातन वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणते. मुळात सनातन संस्कृती, धर्म हा त्यांच्या हिंदू धर्माशी निगडीत आहे. त्याला आदिवासींच्या निसर्गपूजक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीशी जोडून आदिवासींना हिंदू धर्माकडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी व आरएसएस प्रणीत जनजाती सुरक्षा मंच करत आहे. मुळात आदिवासी हा कुठल्याही धर्माच्या चौकटीत येत नाही त्याची स्वतंत्र जीवनशैली, संस्कृती, परंपरा, देवदेवता आहे. निसर्गाशी संबंधित असणारे सूर्य, चंद्र, डोंगऱ्या देव, वाघोबा, कणसरा, कळसुबाई, सटूआई, रानजाई, कळमजाई, मावल्या, वेताळ आदि. देवदेवता ह्या आदिवासींच्या आहे आणि त्याच आदिवासी समाज पुजत आला आहे. काळाच्या ओघात आणि शहरीकरणात आलेल्या काही आदिवासींनी गणपती बसवल्या सुरवात केली आणि हिंदूंच्या संस्कृतीच, सणांनाच अनुकरून करू लागले म्हणून त्यांना सनातन हिंदू म्हणू लागले, काहीना प्रलोभने दाखवून, काही गरीब परिस्थितीच्या विवंचनेत असलेल्या आदिवासींना आर्थिक लाभाची भुरळ पाडून ख्रिस्ती मिशनर्यांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित केले तर काही आदिवासी हे मुस्लीम धर्माकडे आकर्षिले गेले आहे यात दुमत असण्याच कारण नाही. परंतु आजही ते आपल्या मूळ देवदेवतांच, संस्कृती, परंपरेच आचरण करत आहे.
आणि त्याचाच गैरफायदा अशा प्रकारे लोक घेत आहे. यापूर्वीही भारतीय जनता पार्टी व आरएसएसशी संबंधित सन २०१३ मध्ये ओ.पी. शुक्ला नामक व्यक्तीने आदिवासीमधील कोकणा आणि महादेव कोळी (कोळी महादेव) या जमाती समृद्ध झाल्या असून त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे याप्रकारची याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल केली होती त्याविरोधात देखील नाशिक, पुणे येथील आदिवासी सामाजिक संघटनांनी प्रामुख्याने माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब, विद्यमान आमदार हिरामण खोसकर, प्रा. अशोक बागुल सर, कैलास शार्दुल साहेब, रवींद्र तळपे, सुहास नाईक, आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून निष्णांत वकील देऊन केस जिंकली.
सांगायचं तात्पर्य आदिवासींना एक ना एक प्रकारे अडचणीत आणून त्यांना संपवायचा, आदिवासींच्या अनु. जमातीच्या यादीतून वगळायच आणि ज्या बिगर आदिवासी जातींची मागणी आहे आम्हाला आदिवासी करा त्यांना आदिवासींच्या यादीत घुसवायच असा कुटील डाव चालू आहे. त्याला आपलेच घरभेदी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. नाशिक मध्ये १२ ओक्टो. ला धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश होऊ नये म्हणून व ईतर मागण्याकरिता भव्यदिव्य असा लाखो आदिवासींचा महामोर्चा निघाला त्यावेळी हे आयोजक आणि भारतीय जनता पार्टीशी निगडीत आदिवासी लोकप्रतिनिधी बिळात लपून बसले होते आणि आता आदिवासी समाजाच्याच विरोधात, आदिवासींना देशोधडीला लावण्याचे कार्यक्रम करू लागले आहे. त्यांच पुढे काय करायचं हे समाजकार्य, लग्नकार्य, नातेगोते यामध्ये कितपित सामील करून घ्यायचं हे समाजाने ठरवावे.
भारतीय जनता पार्टी व आरएसएस प्रणीत जनजाती सुरक्षा मंच, यांचे हे डाव आपल्या सर्व आदिवासी जमातींना समाजानी मिळून उधळून लावायचे आहे. त्यासाठी डोळ्यात तेल घालून, जागरूक राहून, कायद्याच्या चौकटीत, लोकशाही मार्गाने, आदिवासी समाजाच प्रबोधन करत राहावे लागेल. आणि जर डी-लिस्टिंग करायचेच असेल तर त्याची सुरवात जे आदिवासी हिंदू धर्माच अनुकरण करत आहे त्यांच्यापासून करा त्यासोबतच ख्रिस्ती, मुस्लीम धर्माच अनुकरण करत असलेल्या आदिवासींच पण डी-लिस्टिंग करा. पण लक्षात ठेवा कोणाला आदिवासींमध्ये ठेवायचं आणि कोणाला वगळायचं याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना कोणत्या न्यायालयाला, ना राज्य शासनाला, ना केंद्र शासनाला तुम्ही आदिवासी समाजात पाडत असलेली फुट एकमेकांत लावत असलेली भांडणे हे आम्ही कधीही शक्य होऊन देणार नाही.
म्हणून आपल्या निसर्गपूजक संस्कृतीशी, धर्माशी, परंपरेशी जोडण्याच, प्रबोधन करण्याच काम जागृत आदिवासी सामाजिक संघटना करत आहे. म्हणून आपली निसर्गपूजक आदिवासी संस्कृती आदिवासी समाजाने जोपासावी व ह्या डी-लिस्टिंग मेळाव्यात खऱ्या आदिवासी समाजाने सहभागी होऊ नये असे आवाहन आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने, उलगुलान मोर्च्याच्या वतीने समाज बांधवाना करण्यात येत आहे.
- आपला नम्र
- देवा वाटाणे. समन्वयक.
- उलगुलान मोर्चा, नाशिक.
- प्रवक्ता :- आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, नाशिक.