ग्रामी अवार्ड मध्ये भारताचा डंका; शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांना पुरस्कार….!

लाल दिवा : प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्यासह चार जणांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. शक्ती बँडच्या ‘दिस मोमेंट’ हा पुरस्कार मिळाला आहे. या विजयानंतर भारतीयांची मान उंचावली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. तबलावादक झाकीर हुसैन यांच्यासह गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या ‘शक्ती’ या फ्युजन बँडनेही पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम विभागात त्यांनी पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताची मान उंचावली गेली आहे. ग्लोबल म्युझिक अल्बम आणि ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या दोन्ही विभागात भारतीय कलाकारांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

संगीत क्षेत्रातील जगभरातील सर्वांत मोठ्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला रविवारी रात्री 8.30 (भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी 6.30) वाजल्यापासून सुरुवात झाली. जॉन मॅकलॉघलिन, झाकिर हुसैन, शंकर महादेवन, वी. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांनी एकत्र मिळून बनवलेल्या ‘शक्ती’ बँडच्या ‘दिस मोमेंट’ला ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील या नामवंत कलाकारांना हा पुरस्कार स्वीकारताना पाहून भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्यासह देशातील चार संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. उस्ताद झाकीर हुसैन यांनी बासुरीवादक राकेश चौरसिया यांच्यासोबत मिळून दुसरा ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे केला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!