भगरे यांच्या दणक्यात टोलनाक्याची लूट थांबली! निफाड, दिंडोरी, देवळा वासियांना दिलासा! नाशिककरांनाही सवलत मिळणार का?

लाल दिवा निफाड,दि.५ : निफाड तालुक्यातील वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! चांदवड टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत मिळवून देण्यात खासदार भास्कर भगरे यांना यश आले आहे. आता निफाड, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील वाहनधारकांना १० ते २० किमी अंतरासाठी १६५ रुपये ऐवजी स्थानिक शुल्क भरावा लागणार आहे.

खासदार भगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि चांदवड टोल प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही सवलत मिळवून दिली. पिंपळगाव टोलनाक्यावर नाशिक जिल्ह्यातील सर्व वाहनांना आणि चांदवड येथे मालेगाव, सटाणा आणि कळवण तालुक्यातील वाहनधारकांना सवलत मिळत असल्याचे लक्षात आणून देत, निफाड, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील जनतेसाठी देखील सवलतीची मागणी त्यांनी लावून धरली होती. 

पात्र वाहनधारकांनी आधारकार्ड, फास्टॅग क्रमांक, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि मोबाईल नंबरसह टोल प्रशासनाकडे नोंदणी करावी. अडचणीसाठी व्यवस्थापकीय अधिकारी रवी अहिरे (९४०५५५५९२२) (९४२२२ ६२९९४), प्रकल्प संचालक (८१३०० ०६२०५) किंवा सुरेशबाबू (९५०३१ ०४७४३) यांच्याशी संपर्क साधावा. 

 

  • नाशिकलाही सवलतीची मागणी जोरदार

 

दरम्यान, चांदवड टोलनाक्यावर तिन्ही तालुक्यांना सवलत मिळाल्याने नाशिककरांकडूनही आता अशीच मागणी होत आहे. मालेगाव येथील वाहनांना पिंपळगाव बसवंत येथे स्थानिक शुल्क आहे, तर नाशिकच्या वाहनांना चांदवड येथे १६५ रुपये का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी या प्रश्नी लक्ष घालून नाशिककरांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. #नाशिकला_सवलत_हवी हा हॅशटॅग वापरून नागरिकांनी सोशल मीडियावर देखील आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ..

(देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, सिडको)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!