भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटलांची जबरदस्त कामगिरी……अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे व आरोपी ना घेतले ताब्यात….!
लाल दिवा-नाशिक,ता .२९ :आज दिनांक २८ डिसेंबर रोजी भद्रकाली पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील घर नं. ३५७३ च्या समोर पत्राचे शेड मध्ये भोई गल्ली मागे, मिरादातार दर्गाजवळ अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे आणले असल्याची खात्रीशिर माहिती मिळताच सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकासह जावुन पडताळणी केली असता नमुद ठिकाणी (७ गायी व ४ वासरू) असे ११ गोवंश जातीचे जनावरे त्यांची एकुण किमंत २,५०,०००/- रू.ची जनावरे मिळुन आलेली आहेत. सदरची कारवाई सुरू असतांना पोलीस स्टेशन हद्दीत घर नं. २९४२ कुरेशी गल्ली, तेजाळे चौक भद्रकाली येथे देखील अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे आणले असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकासह जावुन पडताळणी केली असता सदर ठिकाणी (१ गायी व २ वासरू) असे ३ गोवंश जातीचे जनावरे त्यांची एकुण किमंत ४०,०००/-रू. वी जनावरे मिळुन आलेली आहेत.
त्यावरून भद्रकाली पोलीस स्टेशनला गुरनं. ४३५/२०२३ व गुरनं.४३६/२०२३ महाराष्ट्र प्राणि सरंक्षण कायदा चे कलम ५(अ), ९ सह प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कलम ११ सह भादवि कलम ४२९ प्रमाणे दि. २९ डिसेंबर रोजी ०५:०५ वाजता गुन्हा दाखल करून एकुण (८ गायी व ६ वासरू) असे १४ गोवंश जातीचे जनावरे त्यांची एकुण किमंत २,९०,०००/- रू.ची जनावरे मिळुन आली असुन सदर जनावरे ही पुढील पालनपोषण करीता पांजरपोळ नाशिक येथे पाठविण्यात आलेली आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ व मा. श्री. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस स्टेशन, सपोनि सत्यवान पवार व पोहवा /१८१० सतिष साळुंके, पोहवा / ३७४ नरेंद्र जाधव, पोना/२५०२ लक्ष्मण ठेपणे, पोना/२४१ अविनाश जुंन्द्रे, पोअं/१५७७ सागर निकुंभ, पोअं/२७२७ धनंजय हासे, पोअं/२११३ योगेश माळी, पोअं/२३७ नितीन भामरे, पोअं/१९८६ निलेश विखे, पोअं/१४६ नारायण गवळी, पोअं/२७२२ दयानंद सोनवणे सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार यांनी केलेली आहे.