खबरदार….कंपनी मालकांना ब्लॅकमेलिंग कराल तर ?..तुम्हाला चांगलाच धडा शिकवू.. भाजपा नगरसेवक राकेश दोंदे यांचा इशारा…!
सिडको, ता. ३० : एकीकडे नाशिक मधील कंपन्या टिकाव्यात तसेच नवीन कंपन्या याव्यात याकरिता सर्व स्तरावर प्रयत्न सुरू होत असताना दुसरीकडे काही जण मुद्दाम ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने उपोषण व आंदोलनाचे शस्त्र पुढे करून उद्योग घालण्याचे प्रयत्न करत आहेत. असा प्रकार थांबला पाहिजे. अन्यथा आम्हाला पोलिस आयतांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी दिला आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने केलेले अतिक्रमित काढावे याकरिता एमआयडीसी कार्यलयाबाहेर उपोषण सुरू आहे. .
अंबड औद्योगिक वसाहतीत हा कारखाना आहे. कंपनीने अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. याविरोधात संबंधितांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्राला एमआयडीसी विभागाने केराची टोपली दाखवली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने महिनाभरापूर्वी उपोषण सुरू केले होते. आता पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या प्रकारामुळे कंपनी मालकांना हकनाक त्रास होत आहे. हा त्रास असाच सुरू राहिल्यास आम्ही सदर कंपनी इतरत्र हलवू असा इशारा देखील कंपनी व्यवस्थापकाने दिला आहे. सदर कंपनीमध्ये साधारण दोन हजार कामगार काम करतात. कंपनी हलविल्यास दोन हजार कुटुंबांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योजक व स्थानिक राजकीय नेते मंडळींनी या कडून विरोध होत आहे. सदर कंपनीच्या समर्थनात अनेकांनी कंपनी व्यवस्थापना मागे उभे राहण्याचे ठरवले असून त्याचे गंभीर परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी आक्रमक पवित्र घेतला असून सदर उपोषणकर्त्यावरोधात
ब्लॅकमेलिंग चा आरोप करुन त्याच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे