सावधान कुठल्याही प्रकारचे ॲप ओपन करू नका……ट्राफिक चलान संबंधित फेक मॅसेज व्हायरल होत असून……फेक ॲप डाउनलोड बाबत लिंक व्हायरल होत आहे…… त्यापासुन सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे…..!

लाल दिवा :: सध्या सायबर हॅकर्स हे ट्राफिक चलान संबंधित नागरीकांच्या व्हाटस्अॅपवर फेक मॅसेज व्हायरल करून फेक एपीके अॅप डाउनलोड करण्याबाबत लिंक व्हायरल करीत आहे. त्यापासुन सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

तो फेक संदेश -“Dear Vehicle owners / Drivers, This is to inform you that you have been issued a traffic challan for the above mentioned violation, Challan No. MH19080549482489, Vehicle Registration No. MH15GW**** to confirm your identity and view the evidence related to this violation pleas install the vahan parivahan app. The app will provide you with the necessary details including the photo evidence of the violation sincerely Nashik Traffic Police” फेक अॅप लिंक apk ‘vahan parivan.apk’ अशा प्रकारे फेक संदेश व एपीके अॅप लिंक नागरीकांचे व्हाटसअॅपवर व्हायरल करून नागरीकांची फसवणुक करण्याची नविन युक्ती सायबर हॅकर्सव्दारे केलील जात आहे त्यास नागरीकांनी बळी पडू नये तसेच नागरीकांची फसवणुक होवु नये याकरीता पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांचे कडुन असे आवाहन करण्यात येते की अशाप्रकारे नाशिक ट्राफिक पोलीसांकडुन कसुरदार वाहनधारकांना व्हाटसअॅपवर मॅसेज पाठविला जात नसुन कोणत्याही प्रकारचे एपीके अॅप डाउनलोड करण्याबाबत सांगण्यात येत नाही.

तरी शहरातील वाहनधारकांनी अशाप्रकारे येणारे फेक संदेश व एपीके अॅप डाउनलोड करू नये व आपली फसवणुक होण्यापासुन सावध रहावे तसेच वाहन धारकांनी त्यांना येणारे ईचलान संदर्भात काही अडचणी असल्यास सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, शहर वाहतूक शाखा, जुने पोलीस आयुक्त कार्यालय, शराणपुर रोड, नाशिक शहर येथे समक्ष संपर्क साधावा असे आव्हान नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक यांचेकडुन करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!